coronavirus : धक्कादायक ! कामचुकार कर्मचारी कागदोपत्री झाले हृदयरोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 09:14 PM2020-07-25T21:14:38+5:302020-07-25T21:16:56+5:30

विष्णूपुरी येथील कोविड केअर सेंटरमधील प्रकार

coronavirus: shocking! Lazy staff became heart patients on Paperwork | coronavirus : धक्कादायक ! कामचुकार कर्मचारी कागदोपत्री झाले हृदयरोगी

coronavirus : धक्कादायक ! कामचुकार कर्मचारी कागदोपत्री झाले हृदयरोगी

Next
ठळक मुद्देड्युटी टाळण्यासाठी बोगस प्रमाणपत्रांचा आधार

- शिवराज बिचेवार

नांदेड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांनी हजारचा आकडा पार केला आहे़ अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणेवरील ताणही वाढला आहे़ प्रत्येक ठिकाणी अतिरिक्त खाटांची व्यवस्था करण्यात येत आहे़ असे असताना चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांकडून मात्र कोविड सेंटरमध्ये कर्तव्य बजावण्यास नाके मुरडली जात आहेत़ विष्णूपुरी येथील वैद्यकीय महाविद्यालय अन् रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनी तर डॉक्टरांची बोगस प्रमाणपत्रेच प्रशासनाकडे सादर केली़ तर काहींनी राजकीय पुढाऱ्यांकडे धाव घेतली़ अशा कामचुकार कर्मचाऱ्यांवर आता प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे़
डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आजघडीला ८९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत़ तर नव्याने ८० खाटांच्या स्वतंत्र कक्षाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे़ त्यामुळे डॉक्टर, परिचारिकांसह चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांवरील ताण वाढणार आहे़ त्यात अगोदरच रुग्णालयात चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे़ कंत्राटी पद्धतीवर दीडशे कर्मचारी भरण्याबाबत संचालक कार्यालयाकडून हिरवा कंदील मिळाला आहे़ परंतु, अद्याप त्यांची भरती झाली नाही़ त्यातही कर्तव्यावर असलेले काही जण कोविड कक्षात कर्तव्य बजावण्यास नकार देत आहेत़ त्यासाठी काहींनी आरोग्याची कारणे दिली़

तसेच पुरावा म्हणून खाजगी डॉक्टरांची बोगस प्रमाणपत्रे सादर केली़ तर काहींनी थेट राजकीय मंडळीकडे धाव घेत प्रशासनावरच दबावतंत्र सुरु केले आहे़ त्यामुळे डॉक्टरांचीही मोठी पंचाईत झाली आहे़ याबाबत वर्ग-४ नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे़ या समितीच्या सदस्यांकडून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना कोविड तसेच इतर कक्षात नियुक्ती दिली जाते़ आता कोविड कक्षात कर्तव्य बजावण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे़ त्यामुळे कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत़

जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविणार नावे
जिल्हाधिकारी डॉ़विपीन ईटणकर यांनी १७ जुलै रोजी रुग्णालयास भेट देवून पाहणी केली होती़ त्यावेळी त्यांनी कोविड ड्युटीसंदर्भात अडथळा निर्माण करणाऱ्या तसेच दबावतंत्राचा वापर किंवा कामचुकारपणा करणाऱ्यांची नावे जिल्हाधिकारी कार्यालयास कळवावी, असे आदेश दिले आहेत़ जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशाराही यावेळी देण्यात आला होता़ सध्या विष्णूपुरी येथील रुग्णालयात २४६ चतुर्थश्रेणी कर्मचारी आहेत़ त्यामध्ये ५५ वर्षे वय असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ५० हून अधिक आहे़ त्यामुळे त्यांना टाळून इतर कर्मचाऱ्यांना कोविड सेंटरमध्ये ड्युटी लावावी लागते़ या ठिकाणी प्रत्यक्षात आणखी २७२ कर्मचाऱ्यांची गरज आहे़

समितीने कामचुकार कर्मचाऱ्यांना दिली समज
च्कार्यरत असलेले अनेक चतुर्थश्रेणी कर्मचारी हे तरुण आहेत़ परंतु कोविड कक्षात कर्तव्य बजावयाचे म्हटले की त्यांनी खाजगी डॉक्टरांकडून मधुमेह, हृदयरोग यासारखे आजार असल्याचे प्रमाणपत्र समितीपुढे सादर केले़ कर्मचाऱ्यांचा हा बनाव समितीच्या लक्षात आला असून त्यांनी अशा कर्मचाऱ्यांना समज दिली आहे़


कोरोना कक्षात ड्युटी न करण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून अनेक क्लृप्त्या सुरु आहेत़ परंतु फक्त गंभीर आजार असलेल्यांनाच यातून सूट दिली जाणार आहे़ अगोदरच चतुर्थश्रेणी कर्मचारी अपुरे असताना अशा पद्धतीने कर्तव्यास नकार देणाऱ्यांवर समितीकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे़ अधिष्ठाता डॉ़चंद्रकांत मस्के यांनी या समितीच्या अध्यक्ष डॉ़वैशाली इनामदार असून डॉ़तांबोळी, डॉग़णेश मनूरकर यांची नियुक्ती केली आहे़
- डॉ़ राजेश अंबुलगेकर, सल्लागार

Web Title: coronavirus: shocking! Lazy staff became heart patients on Paperwork

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.