coronavirus : नांदेड जिल्ह्यात आणखी सहा कोरोना बळी; २३० बाधितांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 07:16 PM2020-08-19T19:16:58+5:302020-08-19T19:19:09+5:30

जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ४ हजार ५५५ एवढी झाली आहे.

coronavirus: Six more corona patients death in Nanded district; An increase of 230 cases | coronavirus : नांदेड जिल्ह्यात आणखी सहा कोरोना बळी; २३० बाधितांची वाढ

coronavirus : नांदेड जिल्ह्यात आणखी सहा कोरोना बळी; २३० बाधितांची वाढ

Next
ठळक मुद्देकोरोनाचा प्रकोप थांबेना सध्या १६६६ जणांवर उपचार सुरू

नांदेड : जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप सुरूच आहे. मागील २४ तासात  आणखी सहा बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोना बळींची एकूण संख्या १५९ एवढी झाली आहे. दरम्यान, बुधवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार आणखी २३० बाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ४ हजार ५५५ एवढी झाली आहे.

मागील आठवड्यात कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण काहीसे कमी झाले होते. मात्र बुधवारी पुन्हा बाधितांचा आकडा दोनशे पार गेल्याने जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. बुधवारी स्वॅब तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात २४, बिलोली ६, हदगाव १३, मुखेड १, हिंगोली १, लातूर १, नांदेड ग्रामीण आणि भोकर प्रत्येकी ३, देगलूर येथे १३, लोहा ११, नायगाव ७ तर परभणी येथील दोघेजण बाधित असल्याचे आढळून आले. अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये नांदेड मनपा क्षेत्रातील ९२ जण बाधित आढळले आहेत.  अर्धापूर, लोहा येथे प्रत्येकी दोन, देगलूर ५, मुदखेड ३, धर्माबाद १६, उमरी ६, नांदेड ग्रामीण ५, भोकर १, कंधार ३,  मुखेड ६, नायगाव २ तर हिंगोलीतील एक जण बाधित असल्याचे अहवालावरुन स्पष्ट झाले.  बुधवारी नव्याने बाधित आढळून आलेल्या २३० रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४ हजार ५५५ वर जावून पोहंचला आहे.

सध्या जिल्ह्यात १६६६ जणांवर विविध कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. यामध्ये सर्वाधिक ७६६ जण पंजाब भवन कोविड सेंटरमध्ये असून विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १८८ जणांवर उपचार सुरू आहे. तर जिल्हा रुग्णालयातील कोविड हॉस्पीटलमध्ये ४० जणांवर उपचार सुरू असून नायगाव येथे ३१, बिलोली ३७, मुखेड १०४, देगलूर ६९, लोहा ५२, हदगाव १२, भोकर २१, कंधार १३, धर्माबाद ९९, किनवट येथील कोविड केअर सेंटरमध्ये १४ जणांवर उपचार सुरू आहेत. अर्धापूर येथे ३, मुदखेड ३१, माहूर ४, नांदेड येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय येथे २१, बारड कोविड केअर सेंटरमध्ये १, उमरी येथे २५ तर जिल्ह्यातील १२९ रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून जिल्ह्यातील चार जणांना उपचारासाठी औरंगाबाद येथे संदर्भित करण्यात आले आहे. तर निजामाबाद आणि हैदराबाद येथील रुग्णालयात प्रत्येकी एकजण उपचार घेत आहे.

आजवर जिल्ह्यात ३१ हजार ६४९ स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील २५ हजार ३२० नमुने निगेटिव्ह प्राप्त झालेले आहेत. तर बुधवारी ११ स्वॅब नमुन्यांचे अहवाल अनिर्णित असून १३ स्वॅब प्रयोगशाळेने नाकारलेले आहेत. सद्य:स्थितीत १७९ स्वॅब तपासणी अहवाल प्रलंबित असून विविध ठिकाणी उपचार घेत असलेल्यांपैकी १७५ जणांची प्रकृती गंभीर आहे.

आजवर १५९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू
मागील २४ तासात जिल्ह्यात ६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामधील पाच जण हे विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनावर उपचार घेत होते तर खाजगी रुग्णालयात एकाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या १५९ एवढी झाली आहे.  
मृतामध्ये लोहा तालुक्यातील ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर आनंदनगर येथील ५२ वर्षीय महिला, हदगाव तालुक्यातील तामसा येथील ६० वर्षीय महिला, नांदेड शहरातील विष्णूपुरी येथील ५४ वर्षीय पुरुष यांचा मृत्यू झाला आहे. तर खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वजिराबाद येथील ८४ वर्षीय पुरुषालाही मृत्यूने गाठले आहे.

१३९  जणांनी केली कोरोनावर मात
बुधवारी आणखी १३९ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केल्याने या रुग्णांना आता औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २७०० एवढी झाली आहे. यामध्ये विष्णूपुरी वैद्यकीय महाविद्यालयातील २, जिल्हा रुग्णालय १, हदगाव ४, माहूर ३, बिलोली १८, किनवट ४, नायगाव १२, मुदखेड ७, मुखेड २८, पंजाब भवन १३, देगलूर १, धर्माबाद ३१, अर्धापुूर ४ तर खाजगी रुग्णालयातील तिघेजण कोरोनामुक्त झाले.
 

Web Title: coronavirus: Six more corona patients death in Nanded district; An increase of 230 cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.