CoronaVirus : चिंताजनक ! नांदेडमध्ये आणखी २० पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या २६ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 09:27 AM2020-05-02T09:27:55+5:302020-05-02T09:54:18+5:30

जिल्हाधिकारी यांनी तातडीची बैठक बोलावली

CoronaVirus: Worrying! 20 more positive in Nanded; total 26 patients | CoronaVirus : चिंताजनक ! नांदेडमध्ये आणखी २० पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या २६ वर

CoronaVirus : चिंताजनक ! नांदेडमध्ये आणखी २० पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या २६ वर

Next
ठळक मुद्देगुरुद्वारा लंगर साहिब येथील सर्व रुग्ण

नांदेड: शनिवारी सकाळी मिळालेल्या अहवालानुसार शहरात कोरोनाचे नव्याने २० रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे रुग्णसंख्या २६ वर गेली आहे. अचानक रुग्णसंख्येत मोठी भर पडल्याने नांदेडकरांत चिंतेचे वातावरण आहे.

 नांदेडमधील गुरुद्वारा लंगर साहिब येथील 97 जणांचे नमुने घेण्यात आले होते, त्यात 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.  शहरात २२ एप्रिल रोजी पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर दुसरा रुग्ण अबचल नगर येथील ४४ वर्षीय रुग्ण सापडला होता. तर परभणी जिल्हयातील सेलू येथून उपचारास आलेली महिला कोरोनाबाधित आढळली होती. यातील पीरबुर्‍हाणनगर येथे राहणार्‍या व सेलू येथून उपचारासाठी आलेल्या महिलेचा गुरुवारी मृत्यू झाला.

नांदेड येथून पहिल्या टप्यात यात्रेकरूंना घेऊन ट्रॅव्हल्स पंजाबकडे रवाना झाल्या होत्या. यात सतरा चालकांचा समावेश होता. हे चालक पंजाब येथून परतल्यानंतर त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले होते. यातील सतरा जणांपैकी तीन ट्रॅव्हल्स चालकांचे अहवाल पॉजिटीव्ह आले होते. शनिवारी गुरुद्वारा लंगर साहिब येथील 97 जणांचे अहवाल घेण्यात आले होते त्यापैकी 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 25 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 

नांदेडमध्ये आतापर्यंत कोरोनाचे एकूण २६ रूग्ण आढळले आहेत. यातील  दोघांचा मृत्यू झाला असून,२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. यात सर्व विभागप्रमुख बैठकीला हजर असून येणाऱ्या उपाय योजनांबाबत यात चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

Web Title: CoronaVirus: Worrying! 20 more positive in Nanded; total 26 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.