coronavirus : चिंताजनक ! नांदेड जिल्ह्यात ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव वाढला; आणखी ३ बाधितांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 10:54 AM2020-07-06T10:54:55+5:302020-07-06T10:55:13+5:30
नांदेड जिल्ह्यात तिन रुग्ण आढळले
नांदेड: देगलुर, नायगाव आणि मुखेडमध्ये सोमवारी सकाळी प्रत्येकी एक रुग्ण आढळल्याने ग्रामिण भागातही कोरोनाचा वेगाने प्रार्दूभाव होत असल्याचे चित्र आहे.
सोमवारी सकाळी नायगाव येथील बोमनाळे गल्ली येथे ५४ वर्षीय पुरुष बाधित आढळला. तर मुखेड येथील तागलेन गल्ली येथेही ६५ वर्षीय वृध्दाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. देगलूर येथेही नाथनगरातील एकाला बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. या तीन रुग्णामुळे जिल्हयातील एकूण रुग्ण संख्या ४४० झाली आहे आजवर ३२१ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. ९९ जणांवर जिल्हयातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने २० जणांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे.
मागील काही दिवसात कोरोनाचा शहराबरोबरच ग्रामिण भागातही प्रार्दूभाव वाढत आहे. प्रशासनाच्या वतीने केलेल्या सन्हें क्षणात आजवर १ लाख ४७ हजार २४९ जणांनी जिल्हया बाहेरून नांदेडमध्ये प्रवेश केला आहे. अशा लोकांनी घरातच थांबावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.