कोविड १९ मुळे झालेल्या म्युकॉर्मायकाॅसिसचे १० रूग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:19 AM2021-04-23T04:19:18+5:302021-04-23T04:19:18+5:30
म्युकॉर्मायकोसिस नावाच्या बुरशीमुळे हा संसर्ग होतो. ही बुरशी पर्यावरणात नैसर्गिक रित्या अस्तित्वात असते. मात्र जेव्हा मानव शरीराची प्रतिकारक शक्ती ...
म्युकॉर्मायकोसिस नावाच्या बुरशीमुळे हा संसर्ग होतो. ही बुरशी पर्यावरणात नैसर्गिक रित्या अस्तित्वात असते. मात्र जेव्हा मानव शरीराची प्रतिकारक शक्ती क्षीण झालेली असते. तेव्हा तिचा संसर्ग शरीरात होतो. या बुरशीचा कण श्वासाद्वारे शरीरात गेल्यावर फुफ्फुस तसेच सायन्सेस यांच्यावर त्याचा दुष्परिणाम होतो. खुल्या जखमा मधूनहीही बुरशी शरीरात प्रवेश करू शकते. मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा असलेल्या रूग्णांना म्हणजेच ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे, अशा लोकांना म्युकॉर्मायकोसिसचा जास्त धोका आहे.
चौकट - म्युकॉर्मायकोसिसची लक्षणे
- तोंडाच्या एका बाजूला सूज येणे, दातातून पू येणे, दात हालणे, जबड्याचे हाड उघडे पडणे, डोके दुखणे, नाकपुड्यामध्ये रक्तसंचय होणे, डोळ्यांना सूज येणे, डोळ्यांची हालचाल कमी होेणे, चेहर्यांच्या वर सूज आलेल्या जागी त्वचा काळी पडणे, नाकात श्वास घेण्यास अडथळे निर्माण होणे, नाकात काळे सुके क्रस्ट तयार होणे, ही लक्षणे आहेत. उपचार करण्यास विलंब झाल्यास दृष्टी जाऊ शकते, तसेच नाक, जबड्याच्या हाडावर दुष्परिणाम होतो.