अनुकंपाधारकांसाठी वेळप्रसंगी नव्या पदाची निर्मिती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:22 AM2021-08-13T04:22:31+5:302021-08-13T04:22:31+5:30
पुण्याच्या शिवाजीनगर पाेलीस लाइनमधील मीना प्रकाश माेहिते व त्यांची मुलगी अस्मिता माेहिते यांनी ॲड. अरविंद बांदिवडेकर यांच्यामार्फत ‘मॅट’मध्ये हे ...
पुण्याच्या शिवाजीनगर पाेलीस लाइनमधील मीना प्रकाश माेहिते व त्यांची मुलगी अस्मिता माेहिते यांनी ॲड. अरविंद बांदिवडेकर यांच्यामार्फत ‘मॅट’मध्ये हे प्रकरण दाखल केले हाेते. त्यात रेल्वेचे पाेलीस आयुक्त व गृह सचिवांना प्रतिवादी बनविले गेले. मीना यांचे पती प्रकाश हे रेल्वे पाेलीस दलात शिपाई म्हणून कार्यरत हाेते. १४ ऑगस्ट २००१ रोजी त्यांचे निधन झाले. त्यामुळे पत्नी मीनाने अनुकंपा तत्त्वावर वर्ग- ४च्या नाेकरीसाठी अर्ज केला. मात्र, त्यांची वयाची ४५ वर्षे पूर्ण हाेऊनही त्यावर उत्तर मिळाले नाही. दरम्यान, त्यांनी मुलगी अस्मिता सज्ञान झाल्याने तिला नाेकरी द्यावी, असा अर्ज केला; परंतु तुमची वयाेमर्यादा संपल्याने आता दुसऱ्या वारसाला अनुकंपा लाभ देता येत नाही, असे कळविण्यात आले हाेते. मॅटमध्ये या प्रकरणावर चर्चा झाली. २००५ च्या जीआरनुसार ५ टक्के जागा दरवर्षी अनुकंपासाठी राखीव आहेत. २००८ ला तीन वर्षांत ५०-२५-२५ या काेट्यानुसार प्रतीक्षा यादीतील जागा भरण्याबाबतचा जीआर जारी करण्यात आल्याचे मॅटच्या निदर्शनास आणून देण्यात आले. अस्मिता माेहिते यांचे नाव प्रतीक्षा यादीत समाविष्ट करा, तिला नाेकरी द्या व इतर पूर्तता तीन महिन्यांत करा, पद नसेल तर वेळप्रसंगी पदाची निर्मिती करा, असे आदेश मॅटने जारी केले.
चौकट...
गलथान कारभारावर नाराजी
माेहिते प्रकरणात शासकीय यंत्रणेची चूक आहे. त्यामुळे मीना यांना नाेकरी मिळाली नाही. शासकीय यंत्रणेच्या या गलथान कारभारावर मॅटने तीव्र नाराजी नोंदविली. या प्रकरणात शासनाच्या वतीने सादरकर्ता अधिकारी ए. जे. चाैगुले यांनी काम पाहिले. याचिकाकर्त्याच्या वतीने ॲड. भूषण बांदिवडेकर व ॲड. गायत्री गाैरव बांदिवडेकर यांनी सहकार्य केले.