२० जणांविरूद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:15 AM2021-01-02T04:15:12+5:302021-01-02T04:15:12+5:30

२५७ कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया कुंडलवाडी - येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २५७ कुटुंब कल्याण करण्यात येऊन १५२ टक्के उद्दिष्ट पूर्ण ...

Crime against 20 people | २० जणांविरूद्ध गुन्हा

२० जणांविरूद्ध गुन्हा

googlenewsNext

२५७ कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया

कुंडलवाडी - येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २५७ कुटुंब कल्याण करण्यात येऊन १५२ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. १६८ शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट होते. लॉकडाऊननंतर १४६ तर लॉकडाऊनच्या आधी १११ महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. याकामी वैद्यकीय अधिकारी डॉ.बालाजी सातमवार, डॉ.विनोद माहुरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

नरसीत ९१ अर्ज

नरसी - येथील ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी ९१ उमेदवारांनी नामांकन पत्र दाखल केले आहेत. नामांकन पत्र दाखल करण्यासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी झाली होती. विशेष म्हणजे एकही अर्ज बाद ठरला नाही. ४ जानेवारी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

मुदखेड - तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी तहसीलदार दिनेश झांपले यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणात सहभागी कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, थर्मल स्कॅनिंग, ऑक्सीमीटर आदींची तपासणी डॉ.आशिष तळणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रशिक्षण कार्यक्रमात नायब तहसीलदार संजय नागमवार, संजय भोसीकर, नायब तहसीलदार शिवाजीराव पाटील, गाजुलवार, व्यंकटेश खानसोळे, मंडळ अधिकारी लाठकर, कुऱ्हाडे, लिपिक मठपती, भुसेवार आदी उपस्थित होते.

हाॅटेल, धाब्यांमध्ये गर्दी

मुखेड - ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हॉटेल व धाब्यांमध्ये आता मोठी गर्दी दिसत आहे. बुधवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. तहसील कार्यालय परिसरात इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. परिसरात असलेल्या हॉटेल व धाब्यांवर यानिमित्ताने मोठी गर्दी झाली.

ग्रामपंचायत बिनविरोध

बिलोली - तालुक्यातील शिंपाळा येथील ग्रामपंचायत बिनविरोध झाली. राजू पाटील शिंदे, गणेशराव पाटील, राजेंद्र मुंगडे, ॲड.शिवकुमार पाटील, बापूराव शिंदे, एल.एस. मुंगडे, लक्ष्मण मुंगडे, राजेंद्र वाघमारे, सुरेश मुंगडे यांनी याकामी पुढाकार घेतला.

दत्तजयंती साजरी

हदगाव - तालुक्यातील तामसा येथे दत्तजयंती यावेळी साधेपणाने साजरी करण्यात आली. मंदिरात अशोक कोडगीरवार यांच्या हस्ते श्री मूर्तीला अभिषेक करण्यात आला. दुपारी दत्त जन्माचा पाळणा होऊन आरती झाली. यावेळी भाविकांची मोठी उपस्थिती होती.

जीवे मारण्याचा प्रयत्न

लोहा - शेतात जनावरे आल्याचा वाद करून लोहा तालुक्यातील मस्की येथे जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना २९ डिसेंबर रोजी घडली. मस्की येथील संपत्ती शिंदे पत्नीसह शेतात जात असताना निवृत्ती पांचाळ यांच्या शेतात जाऊन आरोपींनी जनावरे शेतात आल्याच्या कारणावरून वाद घातला. यातूनच कत्ती, लोखंडी गज, लाकडाने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. माळाकोळी पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.

भाजीपाल्याचे दर घसरले

किनवट - किनवट शहर व तालुक्यात भाजीपाल्याचे दर घसरल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. नगण्य दरात भाजीपाला विक्री होत आहे. भाव मिळत नसल्याने अनेक शेतकरी रस्त्यावरच भाजीपाला टाकून गावाकडे निघून जात आहेत.

Web Title: Crime against 20 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.