पंजाबात गुन्हे अन् नांदेडमध्ये आश्रय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:17 AM2021-02-10T04:17:47+5:302021-02-10T04:17:47+5:30
१९८८, ९०च्या काळात पंजाबमध्ये खलिस्तानवादी दहशतवाद्यानी धुडगूस घातला होता. त्यावेळी सरकारने कारवाई करीत या संघटनेच्या अनेकांना बेड्या ठोकल्या होत्या. ...
१९८८, ९०च्या काळात पंजाबमध्ये खलिस्तानवादी दहशतवाद्यानी धुडगूस घातला होता. त्यावेळी सरकारने कारवाई करीत या संघटनेच्या अनेकांना बेड्या ठोकल्या होत्या. तर अनेकांना चकमकीत यमसदनी धाडले होते. त्यानंतर यातील अनेक दहशतवादी आश्रयासाठी नांदेडला होते. पंजाब पोलीस, ए. टी. एस.ने नांदेडमधून काही खलिस्तानवादी समर्थकांना पकडले होते. याच काळात शहरातील वजिराबाद पोलीस ठाण्यात बॉम्बस्फोट करण्यात आला होता. त्यावेळी मोंढा भागातील एका हॉटेलमध्ये लपून बसलेल्या खलिस्तानवादी दहशतवाद्याला पकडण्यात आले होते. त्यानंतरही पंजाब पोलिसांना वॉन्टेड असलेले गुन्हेगार आश्रयासाठी नांदेडमध्ये येणे सुरूच आहे. गेल्या दोन वर्षांपासून बबर खालसा संघटनेचा हरविंदर सिंग रिंदा याची दहशत कायम आहे. अद्याप तो पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यात आता खलिस्तान जिंदाबाद या संघटनेचा अतिरेकी नांदेडमध्ये सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे नांदेड पोलीस अलर्ट झाले आहेत. पंजाबमध्ये वॉन्टेड असलेले अनेक आरोपी आजही नांदेडमध्ये असून पंजाब पोलीस आणि एटीएस नेहमी नांदेड पोलिसांच्या संपर्कात राहतात.