बँकांमधील ग्राहकांची गर्दी हटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:18 AM2021-05-08T04:18:12+5:302021-05-08T04:18:12+5:30

प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था लोहा : तालुक्यातील एसटी महामंडळाच्या प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था झाली. महामंडळाची बससेवा मागील एक महिन्यापासून बंद ...

The crowd of customers in the banks did not go away | बँकांमधील ग्राहकांची गर्दी हटेना

बँकांमधील ग्राहकांची गर्दी हटेना

googlenewsNext

प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था

लोहा : तालुक्यातील एसटी महामंडळाच्या प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था झाली. महामंडळाची बससेवा मागील एक महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे निवाऱ्यांच्या दुरवस्थेत आणखीनच भर पडली. त्याचप्रमाणे अनेक भागांत निवाऱ्यांचीही दुरवस्था झाली. याकडे एसटी महामंडळाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

मुक्रमाबादेत मुसळधार पाऊस

मुक्रमाबाद : शुक्रवारी दुपारी २.३० पासून ४ पर्यंत मुक्रमाबाद परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. वादळी वाऱ्याने घरातील पत्रे उडाली. परिसरातील रावी, धडकनाळ, हळणी, बामणी, कलंबर, लखमापूर, सावरमाळ, खतगाव, गोजेगाव, मारजवाडी, सावळी आदी गावांमध्येही मोठा पाऊस पडला. पावसामुळे मशागतीची कामे अपूर्णवस्थेत राहिली.

कोविड सेंटर हलविण्याचा घाट

किनवट : येथील १०० बेडचे कोविड केअर सेंटर ४ कि.मी. अंतरावरील कोठारी येथील एका खाजगी संस्थेच्या इमारतीत स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून काही रुग्णांना तेथे हलवण्यात आले आहे. मात्र, हे कोविड सेंटर गरिबांना परवडणारे नाही. सेंटरमध्ये रुग्णांना दोन वेळचे जेवण, नाश्ता, चहा व औषधी पुरवण्यासाठी वाहन मिळणे अवघड आहे. बाहेरून औषधी आणावयाचे झाल्यास किनवटला यावे लागते. एकूणच हे सर्व गैरसोयीचे आहे. किमान २ महिने तरी किनवटच्या नवीन तहसील इमारतीत सेंटर असावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश राठोड यांनी सहायक जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

इंटरनेट नसल्याने गैरसोय

बोधडी : परिसरातील सिंगारवाडी, इंजेगाव, सुंगागुडा, पिंपरफोडी या गावात इंटरनेट सेवा नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. सिंगारवाडीचे सरपंच दत्ता भिसे यांनी इंटरनेट सेवा सुरळीत करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. या भागामध्ये आतापर्यंत कोणत्याही कंपनीची मोबाइल सेवा पोहोचली नसल्याने नेटवर्क तर येतच नाही. त्यामुळे मोबाइल खेळणे बनले. मोबाइलअभावी कुठलाही संपर्क हाेत नाही. येथील नागरिकांना बोधडी येथे जाऊन संपर्क करावा लागतो. त्यामुळे नागरिकांचा अधिक वेळ जातो. बीएसएनएलने टॉवर उभे करून नेटवर्कचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी दत्ता भिसे यांनी संबंधितांकडे केली आहे.

वीज पडून बैल दगावला

भोकर : तालुक्यातील थडकी येथील दत्ता येळणे यांचा बैल वीज अंगावर पडून मृत्यू झाल्याची घटना ७ मे रोजी घडली. त्यामुळे येळणे यांचे मोठे नुकसान झाले. मंडळ अधिकारी महेश वाकडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

शिंपी समाजावर उपासमार

अर्धापूर : लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली. त्यात शिंपी समाजाची अवस्था बिकट झाली. व्यवसाय कसा करायचा, याची चिंता त्यांना लागली. जुने कपडे शिवणे व शिवून घालणे जवळपास बंद झाले. कापड आणून नवीन कपडे शिवण्याऐवजी लोक दुकानातून तयार कपडे घेण्याला प्राधान्य देत ओहत. या पार्श्वभूमीवर आधीच या व्यवसायाला मरगळ आली. त्यात कोरोनामुळे भर पडली. शिंपी व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी मेरू शिंपी समाजाचे तालुकाध्यक्ष साईनाथ रामगीरवार यांनी केली आहे.

मोफत नाश्ता व चहा वाटप

देगलूर : येथील तरुणांनी उपजिल्हा रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना मोफत चहा व नाश्त्याची सोय केली. याकामी अनिल तैंदलवार, विजय तुमावार, कपिल कडलवार, उबेद रैना, नागेश उशकंलवार, नागेश रतकंठवार, राजेश मुपीडवार, रमेश तोपरवार, स्वप्नील गंदलवार आदींनी परिश्रम घेतले.

मास्कचे वाटप

हदगाव : बुलडाणा अर्बन बँकेच्या हदगाव शाखेच्या वतीने कोविड रुग्णाच्या नातेवाइकांना मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही.जी. ढगे, डॉ.स्वामी, व्ही.डी. बेलखेडे, शाखा व्यवस्थापक अनंता शिंदे, कर्मचारी रवींद्र राठोड, सुनील दस्तूरकर, अमृत पांडे, संदीप शेंडेटवाड यांची उपस्थिती होती.

जिल्हा प्रमुखांची भेट

धर्माबाद : शिवसेनेचे जिल्हा प्रमुख उमेश मुंडे येथील धर्माबाद येथील कोविड रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी तालुकाप्रमुख आकाश रेड्डी, संघटक गणेश गिरी, शहर प्रमुख अनिल कमलाकर, साईप्रसाद पेकमवार, उपतालुकाप्रमुख संतोष पाटील आदी उपस्थित होते. यावेळी मुंडे यांनी कोरोना नियमांचे पालन करावे, घाबरू नये, असे रुग्णांना सांगितले.

Web Title: The crowd of customers in the banks did not go away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.