कैलास टेकडीवर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:32 AM2021-03-13T04:32:36+5:302021-03-13T04:32:36+5:30

अवैध वाळूचे उत्खनन मुक्रमाबाद : येथील लेंडी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन होत आहे. ही वाळू तीन ...

Crowd on Kailash Hill | कैलास टेकडीवर गर्दी

कैलास टेकडीवर गर्दी

googlenewsNext

अवैध वाळूचे उत्खनन

मुक्रमाबाद : येथील लेंडी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन होत आहे. ही वाळू तीन ते चार हजार रुपये ब्रास या दराने परिसरात विक्री केली जात आहे. जेसीबीच्या साहाय्याने वाळू उत्खनन केल्याने मोठमोठे खड्डे पडले. ट्रॅक्टर व टिप्परच्या साहाय्याने वाळू छुप्या मार्गाने विकली जात आहे.

सॅनिटरी पॅड मशीनचे उद्घाटन

हदगाव : महिला दिनाचे औचित्य साधून शहरात दोन ठिकाणी ऑटोमॅटिक सॅनिटरी पॅड मशीन लावण्यात आल्या. नगराध्यक्षा ज्योती राठोड, प्रभारी मुख्याधिकारी डी.एन. जाधव यांच्या हस्ते उद्घाटन झाले. बस स्थानक व आठवडी बाजारात या मशीन लावण्यात आल्या. यावेळी स्वच्छता विभागाचे सतीश देशमुख, अभियंता संदीप मते, एस.ए.बोरकर, करण चव्हाण, ओंकार हंडेवार, पंडितराव पतंगे, दयानंद कदम आदी उपस्थित होते.

महिला दिन साजरा

लोहा : जि.प.कें.प्रा.शाळा सुगाव येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी व महिला दिनाचा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जी.एस. मंगनाळे तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच विमलबाई गायकवाड, सदस्या मीनाबाई पाटील, सुमित्रा पाटील, सारिका चिंचाळे, सहशिक्षक किरण राठोड, राजेंद्र तलवारे, जयराम पाटील, मनोज जाधव, धुरपताबाई लंगोटवाड, छबुबाई कुलकर्णी आदी उपस्थित होते.

विहिरीचे भूमिपूजन

उमरी : तालुक्यातील धानोरा बु. येथे शासकीय पाणीपुरवठा विहिरीचे भूमिपूजन भगवानराव सर्जे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी व्यापारी आनंदराव पाटील, सुधाकरराव देशमुख, सरपंच इरबाजी टोपे, उपसरपंच कैलासराव देशमुख उपस्थित होते.

दीपोत्सव कार्यक्रम रद्द

मुदखेड : महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी मुदखेडच्या अपरंपार मठात दीपोत्सव सोहळा साजरा केला जातो. मात्र, यावेळी कोरोनामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. १०० वर्षांपासून हा कार्यक्रम घेतला जातो. शासनाच्या नियमाचे पालन करून मठात दर्शनासाठी भाविकांना सोडण्यात आले.

तालुकाध्यक्षपदी पाटील

धर्माबाद : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या धर्माबाद तालुकाध्यक्षपदी रितेश पाटील यांची निवड झाली. यावेळी सुधाकर जाधव, माजी नगरसेवक रवींद्र शेट्टी, सरपंच मिर्झा जाफर बेग, युवकचे तालुकाध्यक्ष नागेंद्र पाटील, अल्पसंख्यांकचे जावेद, किरण वाघमारे, बाबुराव गोणारकर, हणमंत पाटील आदी उपस्थित होते.

महिला कामगारांना साडीचोळी

हदगाव : तामसा ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त महिला कामगारांना साडीचोळी भेट देण्यात आली. यावेळी सरपंच बालाजी महाजन, जि.प. सदस्य विजयकुमार बास्टेवाड, मधुकर सरोदे, डॉ.बी.आर.आवटे, उपसभापती शंकर मेंढके, सपोनि अशोक उजगरे, ग्रा.पं. सदस्य सुरेश देशमुख, अशोक कोडगीरवार, विकास जाधव, ज्ञानेश्वर कोडगीरवार आदी उपस्थित होते.

कुंडलेश्वर मंदिर बंद

कुंडलवाडी : येथील नागरिकांचे आराध्य दैवत कुंडलेश्वर मंदिर यावेळी बंद ठेवण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. मंदिराच्या प्रवेशद्वाराचे दर्शन घेऊन भाविक आले तसे गेले.

भारतीय किसान संघाची बैठक

नायगाव : नरसी येथे भारतीय किसान संघाची बैठक झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीला प्रदेश संघटनमंत्री दादा लाड, प्रांत कार्यकारिणी सदस्य प्रा.डॉ.माने, जिल्हाध्यक्ष उमेश कुंभारे उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली.

महिला शिक्षकांचा गौरव

कंधार : उस्माननगर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्रा.शाळेत महिला शिक्षकांचा विशेष गौरव कार्यक्रम १० रोजी झाला. कार्यक्रमाला सभापती लक्ष्मी घोरबांड, सरपंच गयाबाई घोरबांड, शिक्षण विस्तार अधिकारी वसंत मेटकर, जयवंतराव काळे उपस्थित होते. यावेळी आशा डांगे, सुशीला आलेवाड, सुनंदा पुठ्ठेवाड, मीनाक्षी लोलगे, मंजुषा देशमुख, प्रेमला गाजुलवाड, पल्लवी नरंगले, सुजाता कुलकर्णी, सीमा जोशी, नभा कुलकर्णी आदी उपस्थित होते.

महिलांना मार्गदर्शन

बिलोली : उमेद नवी दिशा नवी आशा अभियानांतर्गत आदर्श महिला ग्राम संघाच्या वतीने महिला बचत गटाचा कार्यक्रम अर्जापूर येथे घेण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. सरपंच सिद्धार्थ पतंगे अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी कुंभार, कोकिळ, तंटामुक्त अध्यक्ष बालाजी मेडेकर, पो.पा. संजय पतंगे, इम्तीयाज शेख, बाबा पटेल, गंगाधर सोबेकर आदी उपस्थित होते.

Web Title: Crowd on Kailash Hill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.