मशागत करणेही महागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:18 AM2021-04-08T04:18:18+5:302021-04-08T04:18:18+5:30
कोविड प्रतिबंधक लस घ्यावी बामणी फाटा - बामणी फाटा परिसरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. कोरोनामुळे काहींना ...
कोविड प्रतिबंधक लस घ्यावी
बामणी फाटा - बामणी फाटा परिसरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. कोरोनामुळे काहींना जीवही गमवावा लागला. याचे गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाने गावोगावी लसीकरणाची सोय उपलब्ध करून दिली. लसीकरणाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बंडू पाटील यांनी केले आहे.
२२० नागरिकांना प्रतिबंधक लस
बामणी फाटा - हरडफ येथील २२० नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दीपक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. पवार, डॉ. गजभारे, पंडितराव चव्हाण, निर्मला भालेराव, स्नेहा वाठोरे आदींनी याकामी परिश्रम घेतले. लस घेण्यासाठी नागरिकांनी स्वत:हून पुढे यावे, असे आवाहन दीपक कदम यांनी केले.
बरडशेवाळा रोडवर खड्डे
हदगाव - बरडशेवाळा येथील रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सध्या वारंगा ते हदगाव यादरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे सर्व वाहतुकीचा गावातील जुन्या रस्त्यावरून वापर सुरू आहे. बायपास रस्ता होत नसल्याने रोडच्या कडेला असलेल्या घर, दुकान मालकांनी आपले बस्तान पुढे सरकावे, एखादे मोठे वाहन खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात रस्ता चुकवून खाली कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रेणुकादेवी मंदिर पायथ्याशी आगीचे तांडव
माहूर - रेणुकादेवी मंदिर पायथ्याशी ६ एप्रिल रोजी रात्री मोठी आग लागली. ही आग पायथ्याशी असलेल्या दुकानाजवळ येऊन पोहचल्याने व्यापारी घाबरले होते. मात्र, अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग एक तासाच्या परिश्रमातून आटोक्यात आणली. मंदिर पायथ्याशी जवळपास १०० पेक्षा अधिक दुकाने आहेत. दुकानांना आगीतून वाचवण्यासाठी व्यापारी प्रयत्न करीत होते. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केले हाेते. माहूर शहरापासून रेणुका मंदिर असे तीन कि.मी.चे नागमोडी वळणदार अंतर काही मिनिटांत कापून अग्निशामक दल पोहचल्याने मोठा अनर्थ टळला.