डी. के. फार्मसीच्या ऑनलाईन अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांची पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:18 AM2021-01-25T04:18:33+5:302021-01-25T04:18:33+5:30
फार्मसी प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेता व कागदपत्रांच्या त्रुटी दुरुस्त करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासन सीईटी सेल संचलित केंद्रीय ...
फार्मसी प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेता व कागदपत्रांच्या त्रुटी दुरुस्त करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासन सीईटी सेल संचलित केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत नुकतेच काही बदल करण्यात आले. विद्यार्थी व पालक यांना याचा फायदा व्हावा, या उद्देशाने स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे औषधनिर्माणशास्त्र संकुल संचालक डॉ. शशिकांत ढवळे, औरंगाबाद शासकीय महाविद्यालय सहयोगी प्राध्यापक डॉ. राजेश नवले, महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा लातूरचे प्राचार्य डॉ. शिवलिंगेश्वर पाटील तसेच नांदेड फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. नितीन घिवारे यांनी प्रमुख सहभाग नोंदवला.
विद्यार्थ्यांनी चांगले कॉलेज कसे निवडावे, ऑप्शन फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यावी, तक्रार किंवा आक्षेप कसा नोंदवावा, आणि महाविद्यालयात प्रवेशावेळी जाताना कोणती मूळ कागदपत्रे तयार करून घ्यावी. या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप अंभोरे यांनी केले. डॉ. नरेंद्र पत्रे यांनी आभार मानले. सदरील ऑनलाईन चर्चासत्रात नांदेड, हिंगोली, लातूर, परभणी या जिल्ह्यातून पाचशेपेक्षा जास्त पालक व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.