जिल्ह्यात ३ हजार ३३७ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:21 AM2021-07-14T04:21:24+5:302021-07-14T04:21:24+5:30
अतिवृष्टीने जिल्ह्यात ३ हजार ३३७.३२ हेक्टर क्षेत्रातील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. यात नांदेड तालुक्यात १ हजार ३०४ हेक्टर ...
अतिवृष्टीने जिल्ह्यात ३ हजार ३३७.३२ हेक्टर क्षेत्रातील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. यात नांदेड तालुक्यात १ हजार ३०४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. देगलूर तालुक्यात १ हजार ८७९ हेक्टर क्षेत्र, बिलोली तालुक्यात ५२ हेक्टर क्षेत्र आणि नायगाव तालुक्यात १.३२ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. बिलोली तालुक्यात आदमपूर व कुंडलवाडी येथे १५ घरांची अंशत: पडझड झाली. नांदेड तालुक्यात ३१ घरांची पडझड झाली. ४९ घरांचे जिल्ह्यात पावसाने नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात ७७ गावांत अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्यात नांदेड तालुक्यातील ५०, देगलूर १९, बिलोली ५, नायगाव १ आणि उमरी तालुक्यातील दोन गावांचा समावेश आहे.
सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ५६.२ मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. त्यात नांदेड तालुक्यात १२०.१ मि.मी., बिलोली ६७.८, मुखेड ४८.७, कंधार ६५.१, लोहा ७३.७, हदगाव ७३.७, भोकर ४६, देगलूर ५२.३, किनवट १०.४, मुदखेड ७४.१, हिमायतनगर २०.६, माहूर २.५, धर्माबाद ७६, उमरी ६३.६, अर्धापूर ९७.३ आणि नायगाव तालुक्यात ४१.२ मि.मी. पाऊस झाला.
चौकट-------------
३१ महसूल मंडळात अतिवृष्टी
जिल्ह्यात रविवारी ३१ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. त्यात नांदेड तालुक्यातील नांदेड शहर, नांदेड ग्रामीण, वजिराबाद, तुप्पा, वसरणी, विष्णूपुरी, लिंबगाव आणि तरोडा मंडळाचा समावेश आहे. बिलोली तालुक्यातील सगरोळी, कुंडलवाडी, आदमपूर, मुखेड तालुक्यातील जांब, कंधार तालुक्यातील कंधार, कुरुळा, फुलवळ, बारुळ, लोहा तालुक्यात लोहा, कापसी, सोनखेड, शेवडी, कलंबर, देगलूर तालुक्यात खानापूर, मुदखेड तालुक्यात मुदखेड, मुगट, बारड, धर्माबाद तालुक्यात धर्माबाद, करखेली, जारीकोट, उमरी तालुक्यात उमरी, अर्धापूर तालुक्यात दाभड आणि मालेगाव मंडळांत अतिवृष्टी झाली.