अतिवृष्टीने नुकसान, तक्रारींचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:14 AM2021-07-18T04:14:03+5:302021-07-18T04:14:03+5:30
चाैकट जिल्ह्यात ९७ टक्के पेेरणी आटोपली यंदा मृग नक्षत्रावर पावसाने हजेरी लावल्याने पेरण्यांना वेळेवर प्रारंभ झाला. दरम्यान, काही दिवस ...
चाैकट
जिल्ह्यात ९७ टक्के पेेरणी आटोपली
यंदा मृग नक्षत्रावर पावसाने हजेरी लावल्याने पेरण्यांना वेळेवर प्रारंभ झाला. दरम्यान, काही दिवस मिळालेल्या उघडीपीमुळे लागलेला ब्रेक ही पावसाच्या आगमनाने निघून पेरण्यांना गती मिळाली होती. आजपर्यंत जिल्ह्यात ९६.९७ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक देगलूर तालुक्यात ११२.८१ टक्के तर बिलोली तालुक्यात १०५.३८ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. तर नांदेड तालुक्यात ९६.५० टक्के, अर्धापूर - १०१.८८ टक्के, मुदखेड - ९४.६४, लोहा - ९७.६२, कंधार - ९९.९४, मुखेड - ९८.७१, नायगाव - ९५.५० टक्के, धर्माबाद - ९२.८६ टक्के, किनवट - ९२.७७, माहूर - ९८.७४, हदगाव - ९१.४७ टक्के, हिमायतनगर - ९९.११, भोकर तालुक्यात ८६.९२ टक्के तर उमरी तालुक्यात ८८.१७ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. आजघडीला ७ लाख ४२ हजार ८६१ सर्वसाधारण हेक्टरपैकी ७ लाख २० हजार ३५० हेक्टरवर पेरणी झाली आहे.
सोयाबीनचा पेरा वाढला
नांदेड जिल्ह्याच्या ७ लाख ४२ हजार ८६१ सर्वसाधारण हेक्टरपैकी ४ लाख ११ हजार ५५७ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. जिल्ह्यात सोयाबीनसाठी ३ लाख ९ हजार ३७५ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रावर पेरणी अपेक्षित होती. परंतु, त्यात वाढ झाली असून १३२.३९ टक्के सोयाबीनची पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ १ लाख ७२ हजार ९५८ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. तसेच ६६ हजार ४४७ हेक्टरवर तूर पेरणी, मूग २३ हजार ३७३ तर उडिदाची २४ हजार ७३९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. जिल्ह्यात दरवर्षी सोयाबीनचा पेरा वाढत आहे. त्यात दुबार पेरणी करावी लागल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंती दिली.