अवकाळी पावसाने गहु, हरभरा अन् फळबागांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:16 AM2021-03-24T04:16:07+5:302021-03-24T04:16:07+5:30
नांदेड जिल्ह्यात २३ मार्च रोजी पावसाची पुढील प्रमाणे नोंद झाली. यामध्ये नांदेड तालुका - ४.६ मि.मि., बिलोली- ०१. मिमी., ...
नांदेड जिल्ह्यात २३ मार्च रोजी पावसाची पुढील प्रमाणे नोंद झाली. यामध्ये नांदेड तालुका - ४.६ मि.मि., बिलोली- ०१. मिमी., मुखेड- १.४ मिमी., कंधार - ०.७ मिमी., लोहा-३.०६ मिमी., हदगाव- २.१ मिमी., भोकर- ०० मिमी., देगलूर - ०.२ मिमी., किनवट - १.०० मिमी., मुदखेड- १.०० मिमी., हिमायतनगर -०.१ मिमी., माहूर - ७.०० मिमी., धर्माबाद - ०० मिमी., उमरी - ०० मिमी., अर्धापूर- ७.०८ मिमी. नायगाव तालुक्यात ०.७ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकूण सरासरी १.०९ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे.
नांदेड जिल्ह्यात सध्या गहु, हरभरा काढणीचे काम सुरू आहे. कोरोनामुळे मजूरांची मजुरी वाढली आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी मशीनने गहू काढणी करत आहेत. त्यामुळे उपलब्ध मशीनद्वारे गहू काढणीस विलंब लागत असल्याने बहुतांश शेतकर्यांचा गहू शेतातच उभा आहे. तर ज्या शेतकर्यांनी गहू कापणी करून ठेवला आहे. त्यांचेही नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढल्याने त्यानंतर गहु आणि हरभर्याचे पीक घेतले जाते. परिणामी गहु, हरभराही वाढला आहे. नांदेड जिल्ह्यात अर्धापूर, नांदेड, मुदखेड या तालुक्यात फळबागांचेही नुकसान झाले. यामध्ये सर्वाधिक नुकसान आंब्याचे झाले आहे. त्यापाठोपाठ केळीच्या बागांचे नुकसान झाले आहे. सदर नुकसानीचे कृषी विभागाच्यावतीने तत्काळ पंचनामे होणे गरजेचे आहे.
शहरातील वीजपुरवठा वारंवार खंडीत
नांदेड शहर व परिसरातील वीजपुरवठा सोमवारी मध्यरात्रीपर्यंत वारंवार खंडीत होत राहीला. वीजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले होते. त्यात पावसाने हजेरी लावून पुन्हा उघडल्याने उकाडा वाढला होता. नांदेड शहरातील शिवाजीनगर, श्रीनगर, छत्रपती चौक परिसरातील वीजपुरवठा बराच वेळ खंडीत होता.