नांदेड जिल्ह्यात पाटबंधारे मंडळातील धरणे सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:38 AM2019-07-12T00:38:01+5:302019-07-12T00:39:03+5:30

जलसंपदा, जलसंधारण आणि जिल्हा परिषदेच्या प्रकल्पांची पाहणी करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा व जलसंधारण अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.

dams in the Irrigation Board are safe In Nanded district | नांदेड जिल्ह्यात पाटबंधारे मंडळातील धरणे सुरक्षित

नांदेड जिल्ह्यात पाटबंधारे मंडळातील धरणे सुरक्षित

googlenewsNext
ठळक मुद्देराज्य शासनाने दिले होते प्रकल्पांच्या पाहणीचे आदेश

अनुराग पोवळे।
नांदेड : जलसंपदा, जलसंधारण आणि जिल्हा परिषदेच्या प्रकल्पांची पाहणी करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा व जलसंधारण अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षिततेचचा आढावा घेण्यात आला. यामध्ये नांदेड पाटबंधारे मंडळातील मोठी धरण पूर्णत: सुरक्षित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
नांदेड पाटबंधारे मंडळातील १११ प्रकल्प आहेत. त्यात २ मोठे प्रकल्प, १० मध्यम प्रकल्प, ८८ लघु प्रकल्पांचा समावेश आहे तर हिंगोली जिल्ह्यातील ३० प्रकल्पांचाही यात समावेश असून त्यामध्ये येलदरी, सिद्धेश्वर या महत्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर धरणही नांदेड पाटबंधारे मंडळांतर्गत समाविष्ट होते.
राज्यात सरासरी इतका पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी काळात जिवीत व वित्त हानी होण्याच्या घटना नाकारता येत नसल्यामुळे सर्व धरण, तलाव, लघु सिंचन, कोल्हापुरी बंधारे या प्रकल्पांची पाहणी करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले होते. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जलसंपदा, जलसंधारण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अभियंत्यांची बैठक घेतली.
या बैठकीत जिल्ह्यातील सर्व तलाव, धरण, पाणी साठवणुकीचे प्रकल्प यांच्या नोडल अधिकाºयांचे संपर्क क्रमांक संबंधित ग्रामपंचायत आणि तहसीलदारांकडे तात्काळ देण्याचे आदेश दिले. यावेळी जिल्ह्यात असलेले कमकुवत बांध, तलाव यांची तात्काळ डागडुजी करण्याचे आदेशही देण्यात आले आहे. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी, असे निर्देशही डोंगरे यांनी यावेळी दिले. उपविभागीय स्तरावर प्रत्येक अभियंत्यास कार्यक्षेत्रातील प्रकल्पावर देखरेख करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जे प्रकल्प १० मीटरपेक्षा उंच आहेत त्या प्रकल्पांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली आहे. त्याची माहिती प्रादेशिक कार्यालयात देण्यात आली. आवश्यक त्या प्रकल्पावर बांधकाम साहित्य जमा करुन अपात्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. १५ जुलै पर्यंत आणखी एक तपासणी करुन याबाबतचा अहवाल विभागीय कार्यायालयात सादर करण्याच्या सूचना जिल्हा जलसंधारण अधिका-यांनी दिल्या आहेत.
धरणांच्या सुरक्षिततेचा कालबद्ध आढावा
राज्यात जलसंपदा विभाग धरणांच्या सुरक्षिततेचा कालबद्ध आढावा घेत असते. राज्य जलसंपदा विभागाचा सुरक्षा आढावाचा कार्यक्रम निश्चित असतो. नाशिकला सुरक्षितते संदर्भात स्वतंत्र कार्यालय आहे. येथे अधीक्षक अभियंता दर्जाचा अधिकारी आहे. धरणाच्या वर्गवारी नुसार अधिकारी धरणांची पाहणी करतात. त्यात त्रुटींचीही वर्गवारी केली जाते. एक प्रवर्गातील त्रुटी या सर्वाधिक धोकादायक मानल्या जातात.
अशा त्रुटी आढळल्यास तात्कार दुरुस्तीचे काम हाती घेतल्या जातील. दुसºया प्रवर्गातील त्रुटीमध्ये धरणांची नियमित तपासणी केली जाते. तर तिसºया प्रवर्गात धरणस्थळी सुविधा देण्याचा विषय असतो. त्यात रस्ता, लाईट, सुरक्षा आदी बाबींचा समावेश होतो. नांदेड पाटबंधारे मंडळांतर्गत सर्व धरणे सुरक्षित असल्याचे अधीक्षक अभियंता एस.के. सब्बीनवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
१० कोटी ७० लाखांची गरज
नांदेड जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे अंतर्गत १२० सिंचन तलाव, ७० पाझर तलाव, ३४ गावतलाव व १०६ मालगुजारी तलाव असे एकूण ३३० तलाव आहेत. मागील पाच वर्षात ५५ सिंचन तलाव, ४० पाझर तलाव, १८ गाव तलाव, ३७ मालगुजारी तलाव असे एकूण १५० तलाव जलयुक्त शिवार अभियानांतर्गत दुरुस्त केले आहे.
त्याचवेळी उर्वरीत १८० तलावांच्या दुरुस्तीसाठी १० कोटी ७० लाख रुपये निधींची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पावसाळा परिस्थितीत जिल्ह्यातील एकाही तलावाला धोका उत्पन्न होईल, अशी परिस्थिती नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: dams in the Irrigation Board are safe In Nanded district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.