बिबट्याचा धुमाकूळ, दोन गायींवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:29 AM2018-11-28T00:29:22+5:302018-11-28T00:29:58+5:30

सदरच्या घटना गावालगतच असलेल्या सुभाष विद्यालयाच्या पाठीमागच्या शेतात घडल्याने शाळकरी मुलांबरोबरच पालक व शिक्षकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

Dash of leopard, attack on two cows | बिबट्याचा धुमाकूळ, दोन गायींवर हल्ला

बिबट्याचा धुमाकूळ, दोन गायींवर हल्ला

googlenewsNext

वाईबाजार : गोकुळगोंडेगाव येथे गावालगत बिबट्याने धुमाकूळ घातला असून सलग दोन दिवसांत दोन गायींवर केलेल्या हल्ल्यात एका गायीचा फडशा पाडला तर दुसरी गाय नागरिकांच्या ओरडण्याने बालंबाल बचावली. सदरच्या घटना गावालगतच असलेल्या सुभाष विद्यालयाच्या पाठीमागच्या शेतात घडल्याने शाळकरी मुलांबरोबरच पालक व शिक्षकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
माहूर तालुक्यातील मौजे गोकुळ गोंडेगाव या गावाशेजारी बिबट्याचा मुक्त संचार असल्याचे मागील काही दिवसांपासून बोलले जात होते. या चर्चेला २५ व २६ नोव्हेंबर रोजीच्या दोन घटनांनी चर्चा खरी असल्याचे दाखवून दिले. दरम्यान, २५ नोव्हेंबर च्या मध्यरात्री दत्ता गुलाब गावंडे यांच्या गायीवर बिबट्याने हल्ला चढवून गावालगत असलेल्या सुभाष विद्यालयाच्या पाठीमागील शेतात ओढत नेवून तिचा फडशा पाडला़ ही घटना २६ नोव्हेंबर रोजी उघडकीस आल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून घटनास्थळास भेट देवून तथा पंचनामा करून पुढील कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू केली. या घटनेस अवघ्या काही तासांचाही अवधी उलटला न् उलटला तेच रात्री ९ वाजेच्या सुमारास पुन्हा बिबट्याने विष्णू नामदेवराव जगताप यांच्या गायीवर हल्ला केला. गायीच्या आवाजाने ही बाब नागरिकांच्या लक्षात आली. तद्नंतर लाठीकाठी व मोठ्या संख्येतील लोकांच्या ओरडण्याने बिबट्याने गायीला सोडून पळ काढला. त्यामुळे जगताप यांची गाय बालंबाल बचावली असली तरी गंभीर स्वरूपात जखमी झाली आहे. सदरच्या दोन्ही घटना अगदी गावाशेजारी असलेल्या सुभाष विद्यालयामागील शेतात घडल्याने विद्यार्थी, पालक व शिक्षकवर्गात प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने लक्ष घालून बिबट्याचा पुरता बंदोबस्त करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
कुपटी परिसरात वन्यप्राण्यांचा हैदोस
कुपटी : कुपटी परिसरात वन्यप्राण्यांनी हैदोस घातला.शेतातील उभ्या पिकांची नासाडी केली जात आहे़ यामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून आधीच विविध कारणांमुळे अडचणीत असलेला शेतकरी आता वन्य प्राण्यांमुळे त्रस्त झाला आहे़ शेतकरी वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान होवू नये, यासाठी रात्रीला जागल करीत आहेत.

Web Title: Dash of leopard, attack on two cows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.