विद्यापीठाच्या लॅबमध्ये आजपर्यंत ८० हजार कोरोना चाचण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:18 AM2021-04-21T04:18:03+5:302021-04-21T04:18:03+5:30

विद्यापीठामध्ये कोविड तपासणी लॅबचे प्रमुख डॉ. झोरे यांच्यासह जैवशास्त्र विभागातील होतकरू विद्यार्थी आणि संशोधकांनी योगदान दिले आहे. नांदेड ...

To date, 80,000 corona tests have been performed in university labs | विद्यापीठाच्या लॅबमध्ये आजपर्यंत ८० हजार कोरोना चाचण्या

विद्यापीठाच्या लॅबमध्ये आजपर्यंत ८० हजार कोरोना चाचण्या

Next

विद्यापीठामध्ये कोविड तपासणी लॅबचे प्रमुख डॉ. झोरे यांच्यासह जैवशास्त्र विभागातील होतकरू विद्यार्थी आणि संशोधकांनी योगदान दिले आहे. नांदेड विद्यापीठाने कोरोनाप्रमाणेच इतर विषाणू संसर्गाचे निदान करणारी यंत्रणा येथे उपलब्ध केली असून, प्रगत तंत्रज्ञान आणि साहित्यसामग्री उपलब्ध करून विविध तपासण्या करण्याची तयारी करण्याबाबतचे काम सुरू असल्याचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी सांगितले. सध्या या लॅबमध्ये सेमी ऑटोमॅटेड टेस्टिंग पद्धतीने तपासणी करण्यात येत असून येणाऱ्या काळात येथे पूर्णपणे ही पद्धती कार्यान्वित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

कोरोनामुळे जीवनावर सर्वच बाबतीत बदल घडले. या आजाराने डॉक्टर्स, शास्त्रज्ञ, आरोग्य कर्मचारी यांच्या अहोरात्र प्रयत्न करीत ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंटमध्ये पुढाकार घेऊन कोरोनामुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी मदत झाली. विद्यापीठ कोरोना तपासणी लॅबसाठी परभणी, नांदेड, हिंगोली या तीनही जिल्हाधिकारी कार्यालयाने आवश्यक ती मदत आणि मनुष्यबळ हे विद्यापीठाने उपलब्ध करून दिले.

चौकट- या तपासणी लॅबविषयी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी, अडचणीच्या काळात नांदेड विद्यापीठाने कोरोना तपासणीसाठी विद्यापीठाने सहकार्याची आणि संशोधक भूमिका घेतली. याबाबत विद्यापीठाचे कौतुक केले पाहिजे. माणसाचं जीवन अमूल्य आहे, हे अमूल्य जीवन वाचवण्यात पुस्तक किंवा ज्ञान उपयुक्त असते, तसेच ज्ञानदान करण्याबरोबरच जीवनदान देण्याचे किंवा जीवन वाचवण्याचा धडा विद्यापीठाने देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका व जबाबदारी पार पाडली म्हणूनच या विद्यापीठास ‘कोरोना योद्धा विद्यापीठ’, असं म्हणता येईल.

Web Title: To date, 80,000 corona tests have been performed in university labs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.