‘स्वारातीम’ विद्यापीठांतर्गत हिवाळी परीक्षांच्या तारखा जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:18 AM2021-04-04T04:18:24+5:302021-04-04T04:18:24+5:30
क्लस्टर (महाविद्यालयाचा समूह) पद्धतीने महाविद्यालय स्तरावर व विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या सुधारित तारखा खालीलप्रमाणे आहेत. पदवी अभ्यासक्रम प्रथम ...
क्लस्टर (महाविद्यालयाचा समूह) पद्धतीने महाविद्यालय स्तरावर व विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या सुधारित तारखा खालीलप्रमाणे आहेत. पदवी अभ्यासक्रम प्रथम वर्ष आणि बी.सी.ए., बी.सी.एस., प्रथम वर्ष पहिल्या व दुसऱ्या सत्राची पूर्वीची तारीख १ ते १२ एप्रिलऐवजी सुधारित वेळापत्रकानुसार ०६ ते १७ एप्रिलदरम्यान होईल. पदव्युत्तर अभ्यासक्रम व इतर व्यावसायिक अभ्यासक्रम पहिले व दुसरे सत्राच्या परीक्षा पूर्वीच्या तारखांप्रमाणे १० ते २० एप्रिलदरम्यान होणार आहेत. औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी, विधी, बी.एड., एम.एड., एम.बी.ए., एम.पीएड., प्रथम वर्ष अभ्यासक्रम पहिल्या व दुसऱ्या सत्राच्या परीक्षेच्या तारखेत कोणताही बदल केला नाही. पूर्वीप्रमाणेच २० ते ३० एप्रिलदरम्यान होणार आहेत.
विद्यापीठ स्तरावर होणाऱ्या परीक्षांच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत. सर्व पदवी व व्यावसायिक अभ्यासक्रम जसे की, बी.सी.ए., बी.सी.एस., बी.एस्सी., (एच.एस., आय.टी., एन.टी., बी.टी.,बी.आय., एफ.एस.,) व इतर सर्व बी.व्होक, अभियांत्रिकी, विधी व फार्मसी अंतिम वर्षाच्या परीक्षा पूर्वीच्या तारखांप्रमाणे २२ ते ३१ मार्चदरम्यान होणार होत्या. त्यात बदल केला असून सदर परीक्षा ०६ ते १६ एप्रिलदरम्यान होणार आहेत. पदव्युत्तर एम.ए., एम.कॉम, एम.एस्सी. व व्यवसायिक अभ्यासक्रम बी.एड., एम.एड., बी.पीएड, एम.पीएड., बी.लिब., एम.लिब., बी.जे., एम.जे., अभ्यासक्रम अंतिम वर्ष तसेच एक वर्ष पदविका परीक्षा २२ ते ३१ मार्चऐवजी १७ ते २६ एप्रिलदरम्यान होणार आहेत. सर्व संकुले, विद्यापीठ परिसर, उपकेंद्र लातूर, परभणी येथील सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रम पहिल्या व दुसऱ्या सत्राच्या परीक्षा ०१ ते १० एप्रिलऐवजी १५ ते २४ एप्रिलदरम्यान होणार आहेत.
वरीलप्रमाणे हिवाळी-२०२० परीक्षा ऑनलाइन व ऑफलाइन पूर्वनियोजित पद्धतीने घेण्यात येणार आहेत. ऑफलाइन पद्धतीने महाविद्यालयीन स्तरावर व परीक्षा केंद्रावर परीक्षा घेताना शासनाने वेळोवेळी निर्देशित केलेल्या कोविड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचे पालन करण्यात यावे, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवी सरोदे यांनी केले आहे.