माहूर गडावरील दत्त जयंती यात्रा या वर्षी रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:43 AM2020-12-17T04:43:16+5:302020-12-17T04:43:16+5:30
प्रतिवर्षी माहूर गड येथे दत्त जयंती यात्रा उत्सवासाठी मराठवाड्यासह महाराष्ट्रातील लाखो भाविक दर्शनासाठी आपली हजेरी लावत असतात. मात्र सध्या ...
प्रतिवर्षी माहूर गड येथे दत्त जयंती यात्रा उत्सवासाठी मराठवाड्यासह महाराष्ट्रातील लाखो भाविक दर्शनासाठी आपली हजेरी लावत असतात. मात्र सध्या जगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारी मुळे शासनाच्या नियमाच्या अधीन राहून माहुर गड येथील दत्त शिखर संस्थानने यावर्षी दत्त जयंती सोहळा अगदी साधेपणाने मंदिर परिसरात विधिवत पद्धतीने साजरा होणार असुन सुमारे सात दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात भाविकांनी मंदिर परिसरात न येता घरी राहूनच हा सोहळा साजरा करावा व या दरम्यान मंदिर परिसरात कोणीही गर्दी करू नये असे आवाहन श्री दत्त शिखर संस्थानचे अध्यक्ष महंत मधुसूदन भारती गुरू अच्युत भारती यांनी सर्व दत्त भक्तांना केले आहे.
दरवर्षी दत्त जयंती उत्सवाच्या अनुशंगाने संस्थान कडून पत्रकार परिषद घेऊन संस्थान च्या घडामोडी व पुढील विकास कामा संदर्भात चर्चात्मक बैठकीचे आयोजन केले जाते व तात्काळ यात्रा काळातील होणाऱ्या तयारीची माहिती दिली जाते. परंतु यावर्षी होणाऱ्या दत्तजयंती उत्सवाच्या माहितीचे परिपत्रक दत्त शिखर संस्थानने ८ नोव्हेबर रोजी काढण्यात आले परंतु पत्रकारांना ती माहिती आज १६ नोव्हेबर रोजी दिली हे विशेष.
यावर्षी पत्रकारा सोबत होणाऱ्या संस्थान च्या विकासात्मक विविध चर्चेपासून संस्थानचे विश्वस्त व नवनियुक्त व्यवस्थापक कुठेतरी टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप अनेक भाविकांनी यावेळी केला आहे.