गुढीपाडव्यापासून वाघा बॉर्डर येथे होणार दत्तनाम सप्ताह

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 06:31 AM2023-03-12T06:31:26+5:302023-03-12T06:33:03+5:30

‘देश के लिए सात दिन’ हा त्यांचा हेतू आहे.

dattanam week will be held at wagah border from padwa | गुढीपाडव्यापासून वाघा बॉर्डर येथे होणार दत्तनाम सप्ताह

गुढीपाडव्यापासून वाघा बॉर्डर येथे होणार दत्तनाम सप्ताह

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, माहूर (जि. नांदेड) : येथील आनंद दत्त धामचे प्रमुख तथा राष्ट्रसंत साईनाथ महाराज हे गुढीपाडव्यापासून (२२ मार्च) भारत-पाक सीमेवरील अट्टारी, वाघा बॉर्डर येथे आपल्या सुमारे दीड हजार भक्तांसोबत अखंड दत्तनाम सप्ताह करणार आहेत. भारत-पाक सीमेवर अशा प्रकारचा सप्ताह आयोजित करण्याचा हा  देशातील पहिलाच उपक्रम आहे. आनंद दत्त धामचे प्रमुख तथा राष्ट्रसंत साईनाथ महाराज आणि विश्वस्त बबनराव जगाडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत संयुक्त माहिती दिली.

हातात झाडू आणि काखेत झोळी असलेले साईनाथ महाराज हे २००६ पासून आनंद दत्त धामचे प्रमुख म्हणून कार्यरत आहत. स्वच्छता अभियान, शिक्षण, महिला सक्षमीकरण, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती, शेतकरी आत्मचिंतन आणि जिवाचा उद्धार या सप्तसूत्रीनुसार ते काम करत आहेत. ‘देश के लिए सात दिन’ हा त्यांचा हेतू आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: dattanam week will be held at wagah border from padwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nandedनांदेड