कंधार शहरातील दुचाकी चोरीचा बंदोबस्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:15 AM2020-12-25T04:15:11+5:302020-12-25T04:15:11+5:30

कंधारः शहरात मोठया प्रमाणात रात्री व दिवसाढवळ्या दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले असून भितीचे वातावरण ...

Deal with bike theft in Kandahar city | कंधार शहरातील दुचाकी चोरीचा बंदोबस्त करा

कंधार शहरातील दुचाकी चोरीचा बंदोबस्त करा

Next

कंधारः शहरात मोठया प्रमाणात रात्री व दिवसाढवळ्या दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले असून भितीचे वातावरण आहे. दुचाकी चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी भाजपाचे शहराध्यक्ष अँँड. गंगाप्रसाद यन्नावार यांनी निवेदनाद्वारे कंधार पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे.

शहरात गत अनेक दिवसापासून मोठया प्रमाणात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढलेले आहे. घरा समोर लावलेले वाहने रात्री -अपरात्रीला चोरीला जात आहेत.तसेच विविध काम निमित्त शहरात आलेले नागरिक आपली वाहने विविध कार्यालयासमोर पार्किंग करतात. ही वाहने दिवसा ढवळ्या चोरीला जात आहेत. अशा चोरांचा बंदोबस्त करून दुचाकी चोरीस आळा घालावा अशी मागणी पोलीस निरीक्षक कंधार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनावर भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड, शहराध्यक्ष अँँड.गंगाप्रसाद यन्नावार, नगरसेवक सुनील कांबळे, मधुकर डांगे, चेतन केंद्रे, शंतनू कैलासे, महेश मोरे, शिवाजी पा. लुंगारे, अँँड. सागर डोंगरजकार, श्याम शिंदे, रजत शहापुरे, उमेश भुरेवार, माजी नगरसेवक सतीश कांबळे, किशनराव गित्ते आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Deal with bike theft in Kandahar city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.