झोपडीला आग लागून भाजलेल्या ९५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 02:20 PM2019-02-01T14:20:39+5:302019-02-01T14:21:04+5:30
मौजे इस्लापूरजवळ सहस्त्रकुंड येथील एका ९५ वर्षीय वृद्ध महिलेचा भाजल्याने मृत्यू झाला
नांदेड : किनवट तालुक्यातील मौजे इस्लापूरजवळ सहस्त्रकुंड येथील एका ९५ वर्षीय वृद्ध महिलेचा भाजल्याने मृत्यू झाला़ ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली.
जानकाबाई नारायण तोटेवाड या महिलेने कडाक्याच्या थंडीमुळे झोपडीत शेकोटी पेटवली होती़ थोडावेळ शेकोटीवर शेकल्यानंतर त्यांना गाढ झोप लागली़ याच दरम्यान शेकोटीच्या ठिणगीने झोपडीने पेट घेतला़ यावेळी जानकाबाई यांनी आरडाओरड केली़ त्यानंतर शेजाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला़ या घटनेत जानकाबाई या ७५ टक्के भाजल्या गेल्या होत्या़ त्यांना इस्लापूर येथील प्राथमिक रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले होते़ त्यांना तेथून नांदेडला हलविण्यात आले़ रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला़ या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे़