पाण्यात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:08 AM2021-05-04T04:08:57+5:302021-05-04T04:08:57+5:30

तंटामुक्ती अध्यक्षपदी कदम निवघा बाजार : येथील तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी बाबाराव कदम, तर उपाध्यक्षपदी भीमराव देशमुख यांची नियुक्ती ...

Death by drowning | पाण्यात बुडून मृत्यू

पाण्यात बुडून मृत्यू

Next

तंटामुक्ती अध्यक्षपदी कदम

निवघा बाजार : येथील तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी बाबाराव कदम, तर उपाध्यक्षपदी भीमराव देशमुख यांची नियुक्ती झाली. यावेळी सरपंच शरद कदम, उपसरपंच श्याम कदम, ग्रामसेवक दीपक झरकर, भास्करराव कदम, मधुकर कदम, शिवाजी देशमुख, अरविंद नरवाडे, अमोल कदम, गजानन कदम, जयराम पाईकराव आदी उपस्थित होते.

अधिकारी सावंत सेवानिवृत्त

उमरी : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उमरी शाखेचे वरिष्ठ अधिकारी तानाजी पाटील सावंत सेवानिवृत्त झाले. त्यांना एका कार्यक्रम निरोप देण्यात आला. यावेळी तपासणी अधिकारी जी. आर. कवळे, प्रतिष्ठित नागरिक राजेश्वर वंगलवार, पोलीसपाटील दत्तात्रय वराडे आदी उपस्थित होते.

विद्यार्थी, पालक अस्वस्थ

नायगाव : दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या. बारावीसंदर्भात काय निर्णय घेतला जातो याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले आहे. परीक्षा रद्द झाली तर पुढील अभ्यासक्रमांच्या पात्रता परीक्षा कशा द्यायच्या, असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहे. त्यामुळे या संदर्भातील निर्णय लवकर घेण्याची मागणी होत आहे.

दुचाकी लंपास

किनवट : गंगानगर, किनवट येथून चोरट्यांनी दुचाकी लांबविली. नारायण बाभूळकर लग्नाला गेले होते. त्यांच्या घरासमोरून २४ एप्रिल रोजी दुचाकी (एमएच २६ एफ ६४६८) चोरट्यांनी लांबविली, किनवट पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. चौधरी तपास करीत आहेत.

भाजीपाला उत्पादक संकटात

हदगाव : हदगाव तालुक्यातील बामणी फाटा, पळसा, मनाठा, चिंचगव्हाण, करमुडी, सिबदरा, कवाना, पिंगळी परिसरातील आठवडी बाजार बंद असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कोरोनामुळे आठवडी बाजारांना परवानगी नाही. भाजीपाला मोठ्या प्रमाणात उत्पादित झाला. त्यामुळे भाजीपाला विकावा कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

सहा गावांच्या सीमा बंद

अर्धापूर : तालुक्यातील लहान, गणपूर, मालेगाव, जांभरुण, लोणी (खु.), लोणी बु. या गावांच्या सीमा कोरोनामुळे बंद करण्यात आल्या आहेत. या भागात कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे हा निर्णय घेण्यात आला. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, मास्क लावावा, असे आवाहन करण्यात आले.

वीज पडून गोठ्यास आग

हिमायतनगर : तालुक्यातील वारंग टाकळी येथे वीज पडून गोठ्यास आग लागल्याची घटना ३० एप्रिल रोजी घडली. आगीत उपयोगी साहित्य जळून खाक झाले. माधव राचटकर यांचा गोठा होता. आग लागल्याचे पाहून शेजारी मारोती देवकते यांनी तातडीने धाव घेऊन गोठ्यातील दोन बैल सोडून दिल्याने बैलाचे प्राण वाचले. तथापि, आगीच्या घटनेत एक लाखाचे नुकसान राचटकर यांना सोसावे लागले.

भुईमूग काढणीला सुरुवात

किनवट : तालुक्यातील सिंदगी व परिसरात रबी पिके काढणीच्या कामांनी वेग घेतला. भुईमुगाचे अल्प उत्पादन झाल्याने खर्चसुद्धा निघणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्यावर्षीपासून कोरोनामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शासनाने हात आखडता घेतला असून, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

दोन दुकानदारांवर गुन्हे

धर्माबाद : ‘ब्रेक द चेन’ नियमाचे उल्लंघन करणाऱ्या दोन दुकानदारांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तेलंगणा बसस्थानकाजवळील एम.ए. अजित इलेक्ट्रिक तसेच मच्छी मार्केट भागातील बहार चिकण सेंटर अशी दुकानांची नावे आहेत. परवानगी नसतानाही दुकाने चालू ठेवून नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप या दोघांवर आहे.

तीन जनावरे दगावली

लोहा : तालुक्यातील २ मे रोजी दुपारी विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. तालुक्यातील जामगा शिवणी, अंतेश्वर व मडकी येथे वीज पडून तीन जनावरे दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. अंतेश्वर येथील संजय कऱ्हाळे, जामगा शिवणी येथील सोनाजी जामगे, मडकी येथील बालाजी कदम यांचे नुकसान झाले.

अवकाळी पावसाचा तडाखा

नायगाव : तालुक्यातील कृष्णूर शिवारात रविवारी दुपारी वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली. जनावरे, शेळ्या, मेंढ्या यांचे हाल झाले. पावसाचा वेग प्रचंड होता. मशागत केलेल्या शेतांना पावसाचा फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Death by drowning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.