पाण्याचा अंदाज न आल्याने पितापुत्राचा नाल्याच्या पाण्यात वाहून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 09:35 PM2019-10-28T21:35:31+5:302019-10-28T21:36:11+5:30
बिलोली तालुक्यातील आरळी येथील पिता व पुत्र शेतीच्या कामासाठी जात असताना नाल्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात वाहून गेले
नांदेड - बिलोली तालुक्यातील आरळी येथील पिता व पुत्र शेतीच्या कामासाठी जात असताना नाल्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात वाहून गेले असून दोघांचाही मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी 9 च्या दरम्यान घडली आहे.शेतीच्या कामासाठी गेलेल्या पिता-पुञाचा पाण्यात वाहुन गेल्याने गावकऱ्यांनी शोधाशोध अंती ६ तासाने दोघांचे ही प्रेत पाण्याबाहेर काढण्यात यश आले आहे.गरीब मुस्लिम कुटुंबतील कर्तेधरते गेल्याने कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
आरळी येथील शादुल महेबुब सय्यद वय( 42) मुलगा मेहराज शादुल सय्यद वय (15 ) हे दोघे पितापुत्र हे शेतीच्या कामासाठी गेले होते.शेताच्या बाजूला बेळकोणी मार्गे येणारा डोह असल्याने वडिलांने मुलाला कडेला थांबण्यास सांगितले व बैल बांधण्यासाठी वडील गेले असताना अचानक कडेला उभे टाकलेल्या मुलाचा पाय घसरल्याने तो पाण्यात पडला आणि वाहून जाऊ लागला मुलाला वाचवण्यासाठी गेलेले वडील ही वाहू लागले हे दोघेही नाला सारलीकरणाचे काम चालू असलेल्या ठिकाणी मृत अवस्थेत अडकले. एकीकडे शादुल यांच्या पत्नी सकाळी 9 वाजता गेलेले पती व मुलगा परत न आल्यामुळे गावकऱ्यांना सांगितले तेव्हा गावकऱ्यांनी शोधाशोध केली असता दोघा पितापुत्राचे प्रेत नाला सरळीकरणाच्या काम चालू असलेल्या ठिकाणी अडकल्याचे निर्देशनास आले. गावकऱ्यांनी प्रेत बाहेर काढले. सदरील घटना सोमवारी 9 च्या दरम्यान घडली.
मयत मुलगा मेहराज शार्दुल हा शाळकरी मुलगा असून, येथील श्री गजानन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीत शिक्षण घेत होता. नुकतेच त्याने मार्च शालांत परीक्षेचे फॉर्म पण भरले होते. घटनेची माहिती मिळताच बिलोली पोलिस निरीक्षक भगवान धबडगे यांनी घटनेचा पंचनामा केला.मताताच्या पार्थिवावर शवविच्छेदन करुन दफनविधी करण्यात येत आहे,या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.