रुपलानाईक तांडा मारहाण प्रकरणात एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:38 AM2018-09-19T00:38:33+5:302018-09-19T00:39:04+5:30
रुपलानाईक तांडा येथे ४ सप्टेंबर रोजी तारासिंग राठोड यांच्या डोळ्यात चटणी टाकून कुºहाडीने मारहाण केल्याची घटना घडली होती़ गंभीर जखमी तारासिंग यांचा १७ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला़ या प्रकरणात आरोपींविरूद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून त्यांना अटक करावी़ या प्रकरणात दिरंगाई करणाऱ्या माहूरच्या पोलीस अधिकारी, कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई करावी, या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी शवविच्छेदन करणार नाही, अशी भूमिका घेतली़
लोकमत न्यूज नेटवर्क
वाई बाजार (ता.किनवट) : रुपलानाईक तांडा येथे ४ सप्टेंबर रोजी तारासिंग राठोड यांच्या डोळ्यात चटणी टाकून कुºहाडीने मारहाण केल्याची घटना घडली होती़ गंभीर जखमी तारासिंग यांचा १७ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला़ या प्रकरणात आरोपींविरूद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून त्यांना अटक करावी़ या प्रकरणात दिरंगाई करणाऱ्या माहूरच्या पोलीस अधिकारी, कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई करावी, या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी शवविच्छेदन करणार नाही, अशी भूमिका घेतली़
तारासिंग राठोड यांची १७ वर्षीय मुलगी पूजा राठोड हिच्याकडे गेल्या काही दिवसांपासून शेजारी राहणारा रोशन राठोड वाईट हेतूने पाहत होता़ ४ सप्टेंबर रोजी दुपारी तारासिंग यांनी त्याला समजाविले़ यावर रोशन राठोड याचे कुटुंबिय उत्तम राठोड, छगन राठोड, सुभद्राबाई राठोड, अश्विनी राठोड, अरविंद पवार, प्रेमसिंग राठोड यांनी भांडण करून मयताच्या अंगावर चटणी टाकली व कु-हाडीचे दोन घाव डोक्यात घातले़ यात गंभीर जखमी तारासिंग यांना यवतमाळ येथे हलविण्यात आले़ या प्रकरणात तारासिंग यांच्या मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरूद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली़ आरोपींना जामीनही मिळाला़
दरम्यान, मंगळवारी पहाटे ४ वाजेच्या दरम्यान तारासिंग यांचा मृत्यू झाला़ ही माहिती वा-यासारखी पसरली. यावेळी जवळपास ४०० ते ५०० नागरिक जमा झाले़
यावेळी त्यांनी गोंधळ करण्यास सुरुवात केली़ परिस्थिती बिघडत असल्याचे लक्षात येताच उपविभागीय पोलीस अधिकारी आसाराम जहारवाल यांनी भेट दिली़ यावेळी नातेवाईक संतप्त झाले होते़
जोपर्यंत आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करावी, तपासात दिरंगाई करणा-या माहूरचे पोलीस उपनिरीक्षक एस़व्ही़घोडके, बीट जमादार बाबू जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही अशी भूमिका मयताच्या नातेवाईकांनी घेतली़ त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते़ नागरिकांच्या भूमिकेमुळे अनेक तास शवविच्छेदन रखडले होते़ त्यात नातेवाईकांनी प्रेतही ताब्यात घेतले नव्हते़ यावेळी दोषी अधिकारी व कर्मचा-यांची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे आश्वासन किनवटचे उपविभागीय पोलिस अधिकारी आसाराम जहारवाल यांनी दिल्यानंतर नातेवाईकांनी शवविच्छेदनास परवानगी दिली़ यावेळी सिंदखेडचे सपोनि मल्हार शिवरकर, मांडवीचे संतोष केंद्रे, फौजदार संजय चव्हाण यांनी बंदोबस्त ठेवला़
अधिकारी,कर्मचा-यांची चौकशी करु-जहारवाल
४ सप्टेंबर रोजी दुपारी उपरोक्त घटना घडली़ ६ सप्टेंबर रोजी सकाळी या प्रकरणी गुन्हा दाखल झाला़ येथेच माहूर पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. यातील दोषी अधिकारी, कर्मचा-यांवर कारवाई करावी -समाधान जाधव, जि़प़उपाध्यक्ष, नांदेड,
या प्रकरणात दोषी आरोपी, अधिकारी, कर्मचाºयांची चौकशी करण्यात येईल़ शवविच्छेदन अहवालावरून सविस्तर गुन्हे दाखल करून कारवाई केली जाईल -आसाराम जहारवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी, किनवट-माहूऱ