नांदेडमध्ये मृत्यूसत्र थांबेना! चार दिवसात मृत्यूचे अर्धशतक, २४ तासांत आणखी १४ जणांचा मृत्यू

By शिवराज बिचेवार | Published: October 5, 2023 02:07 PM2023-10-05T14:07:39+5:302023-10-05T14:08:55+5:30

2 ऑक्टोबर गांधी जयंती दिनी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचे तांडव सुरू होते.

Death sessions in Nanded continuous ! Half a century of deaths in four days, 14 more deaths in 24 hours | नांदेडमध्ये मृत्यूसत्र थांबेना! चार दिवसात मृत्यूचे अर्धशतक, २४ तासांत आणखी १४ जणांचा मृत्यू

नांदेडमध्ये मृत्यूसत्र थांबेना! चार दिवसात मृत्यूचे अर्धशतक, २४ तासांत आणखी १४ जणांचा मृत्यू

googlenewsNext

नांदेड- विष्णुपुरी येथील डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मृत्यूचे सत्र थांबता थांबेना झाले आहे. मागील 24 तासात आणखी 14 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे चार दिवसात मृत्यूचे अर्धशतक झाले आहे. 

2 ऑक्टोबर गांधी जयंती दिनी शासकीय रुग्णालयात मृत्यूचे तांडव सुरू होते. 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली होती. अपुरा औषध साठा, परिचारिका, डॉक्टरची रिक्त पदे यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे. त्यानंतर 3 ऑक्टोबर रोजी आणखी 7 रुग्णांचा मृत्यू झाला. 4 ऑक्टोबर ला सहा जणांना जीव गमवावा लावला होता. तर गुरुवारी 5 ऑक्टोबर ला मागील 24 तासात तब्बल 14 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे 4 दिवसात मयतांची संख्या 51 वर पोहचली आहे.

अधिष्ठातावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल
दरम्यान,  डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.आर. वाकोडे यांच्यासह बालरोग विभागातील डॉक्टरवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंधार तालुक्यातील कुरुळा येथील मायलेकाच्या मृत्यू प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयांमधील सोयी-सुविधा-सज्जता आणि एकंदर व्यवस्थेला तुम्ही १० पैकी किती गुण द्याल?

दहा (97 votes)
सात ते नऊ (169 votes)
चार ते सहा (556 votes)
एक ते तीन (1314 votes)
शून्य (2156 votes)

Total Votes: 4292

VOTEBack to voteView Results


 

Web Title: Death sessions in Nanded continuous ! Half a century of deaths in four days, 14 more deaths in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.