ट्रॅक्टरला विजेच्या तारेचा स्पर्श होऊन २ भावांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 02:52 PM2019-07-03T14:52:05+5:302019-07-03T14:54:58+5:30

शेतीत मशागत करताना अचानक विजेची तार पडली  

The death of two brothers by touching the electric cable in Nanded | ट्रॅक्टरला विजेच्या तारेचा स्पर्श होऊन २ भावांचा मृत्यू

ट्रॅक्टरला विजेच्या तारेचा स्पर्श होऊन २ भावांचा मृत्यू

Next
ठळक मुद्दे दोघे भाऊ नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी ट्रॅक्टर घेऊन शेतीत गेले होते.मशागत करीत असताना वीजवाहक तार ट्रॅक्टरवर पडली.

मुखेड (जि. नांदेड) : ट्रॅक्टरद्वारे शेती मशागतीचे काम करीत असताना लोंबकळत असलेली विजेची तार अचानक ट्रॅक्टरवर पडल्याने दोन तरुण सख्ख्या भावांचा अंत झाला. ही दुर्घटना भेंडेगाव बु. येथे मंगळवारी सकाळी ८ वाजता घडली.

रमेश सदाशिव पाटील (वय ३०) व मंगेश सदाशिव पाटील (वय २७), अशी मृतांची नावे आहेत. दोघे भाऊ नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी ट्रॅक्टर घेऊन शेतीत गेले होते. ट्रॅक्टरद्वारे शेतीची मशागत करीत असताना वीजवाहक तार ट्रॅक्टरवर पडली. त्या तारेला मंगेश पाटील यांचा स्पर्श होऊन ते तिथेच चिकटले. ही बाब लक्षात येताच रमेश हे हातात काठी घेऊन भावाच्या मदतीला धावले. काठीने विद्युत तार बाजूला करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र, तार निसटून ती रमेश यांच्याच अंगावर पडली. यात दोघांचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सरपंच लालबा कांबळे व इतरांनी घटनास्थळी धाव घेऊन विद्युत प्रवाह बंद केला. यानंतर दोघांचे मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठविण्यात आले.

मंगेश यांचे गत वर्षीच लग्न झाले होते, तर रमेश यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.  विद्युत तारेच्या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही महावितरणने दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप  ग्रामस्थांनी करून याला जबाबदार असणाऱ्या संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Web Title: The death of two brothers by touching the electric cable in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.