ड्रेस कोडसंदर्भातील शासन निर्णयाला कर्मचाऱ्यांचा खो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:54 AM2021-01-08T04:54:47+5:302021-01-08T04:54:47+5:30
प्रतिक्रिया- राज्य शासनाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून, ड्रेस कोडसंदर्भातील नियमांचे जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रत्येक कर्मचाऱ्याने पालन केले पाहिजे, अशा सूचना ...
प्रतिक्रिया-
राज्य शासनाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून, ड्रेस कोडसंदर्भातील नियमांचे जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रत्येक कर्मचाऱ्याने पालन केले पाहिजे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी एका बैठकीत दिल्या आहेत. त्याअनुषंगाने जवळपास सर्वच कर्मचारी नीटनेटका पोशाख परिधान करीत आहेत.
-प्रदीप कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी
पेहरावाबद्दल नियमावली- महिला कर्मचाऱ्यांनी साडी, सलवार, चुडीदार, कुर्ता, ट्राउझर, पॅन्ट, टी-शर्ट, तसेच आवश्यक असल्यास दुपट्टा, असा पेहराव करावा, तर पुरुष कर्मचाऱ्यांनी शर्ट, पॅन्ट, ट्राउझर, असा पेहराव करावा, परिधान केलेला ड्रेस स्वच्छ व नीटनेटका असावा, याची दक्षता घ्यावी, तसेच बूट व चपलेचा वापर करावा.
राज्य शासनाने ड्रेस कोडसंदर्भात केलेल्या नियमावलीपूर्वी खादीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने निर्णय केला होता; परंतु या निर्णयाकडेही अधिकारी वर्गाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. आठवड्यातून किमान एक दिवस शुक्रवारी खादी कपड्यांचा पेहराव करावा, असा निर्णय घेण्यात आला होता.