बोंडअळीमुळे कापूस उत्पादनात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:29 AM2017-11-29T00:29:47+5:302017-11-29T00:29:53+5:30
कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे़ त्यातच शासनाचा हमीभाव गतवर्षीपेक्षा १४०० रूपयांनी कमी आहे़ त्यामुळे बळीराजा दोन्हींकडून अडचणीत सापडला आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे़ त्यातच शासनाचा हमीभाव गतवर्षीपेक्षा १४०० रूपयांनी कमी आहे़ त्यामुळे बळीराजा दोन्हींकडून अडचणीत सापडला आहे़ जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या केंद्रावरील कापूस खरेदी निरंक आहे तर सीसीआयच्या केंद्रावर ५ टक्केदेखील खरेदी नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे़
नांदेडसह हिंगोली, परभणी आणि यवतमाळ जिल्ह्यांतील बहुतांश शेतकरी आपले पांढरे सोने नांदेड जिल्ह्यात येणाºया परराज्यातील व्यापाºयांना विकतात़, परंतु यंदा चित्र बदलल्याचे पहायला मिळत आहे़ नांदेडसह मराठवाड्यातील कापसावर बोंडअळी (गुलाबीअळी)चा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे़ कापसाचे बोंड पूर्णपणे आतील बाजूने खाऊन टाकणाºया या बोंडअळीचा प्रादुर्भाव बीटी बियाणांनी रोखता येतो, असा दावा करणाºया औषध कंपन्या आणि कपाशी बियाणे कंपन्यांचे सर्वच दावे यंदा फोल ठरले आहेत़ जिल्ह्यातील कापूस लागवड क्षेत्रात सव्वालाख हेक्टरची घट झाली असून यंदा जवळपास सव्वादोन लाख हेक्टरवर कपाशीची लागवड झालेली आहे़ परंतु, उत्पन्न मागील वर्षीच्या तुलनेत पन्नास टक्क्यांनी घटले आहे़ नांदेड, हिंगोली तसेच तेलंगणा राज्यात मध्य प्रदेश आणि गुजरात येथील व्यापाºयांच्या जिनिंग फॅक्ट्री आहेत़ तसेच परराज्यातील व्यापारीदेखील गावागावांत जाऊन खरेदी करीत आहेत़ शासनाने मागील वर्षात कापसाला प्रतिक्विंटल ५७०० रूपये भाव दिला होता़ तर ४३२० रूपये प्रतिक्विंटल भाव आहे़ जवळपास १४ रूपये प्रतिक्विंटलमागे यंदा भाव कमी जाहीर केला़ त्यामुळे व्यापारीदेखील ४४०० ते ४६०० रूपये प्रतिक्विंटलप्रमाणे कापसाची खरेदी करीत आहेत़ विरोधी पक्षासह शेतकरी संघटनांनी कापसाला वाढीव भाव देण्याची मागणी केली आहे़ यासाठी आंदोलने, मोर्चे काढले़ त्यामुळे हिवाळी अधिवेशनात सरकारकडून कापसाचा वाढीव हमीभाव दिला जाईल, अशी अपेक्षा आहे़
त्यामुळे बहुतांश शेतकºयांनी कापूस घरातच ठेवल्याचे शेतकरी कदम यांनी सांगितले़ तर कापूस घेवून येईपर्यंत ४५०० रूपये भाव देण्याचे आश्वासन देवून व्यापारी कापूस चांगल्या प्रतीचा नसल्याचे सांगून ४३०० रूपयेच भाव देऊन शेतकºयांची लूट केली जात आहे़