हदगाव : तालुक्यातील ६00 लोकवस्तीचं गायतोंड हे गाव. मागासवर्गीय बहुतुल्य वस्ती. भूमिहीन मजूर व अल्पभूधारक सर्वत्र मिळतील. पाण्याची व्यवस्था जेमतेम. शेताशेतामध्ये १५ बाय २0 आकाराने खोदलेल्या विहिरी आढळतात., परंतु जनावरांना व भाजीपाला खाण्यापुरताच पाणीसाठा येथे उपलब्ध आहे. येथील बहुतांश शेतकरी भाजीपाला काढून विक्री करतात. मनाठा, बामणीफाटा, वारंगा व हदगाव येथील आठवडी बाजारात येथील मंडळी जातात. अनेकांनी थोडीफार शेती व भाजीपाला विक्रीवर मुलींचे लग्न केले. मुलांचे शिक्षणही उरकले. अशांच्या चेहर्यावर आता मात्र असमाधानाची भावना पसरली आहे. आता काय करावे? वर्ष कसं काढणार? वर्ष धकलं तरी पुढं काय? पुढची पेरणी. आता पेरणीसाठी घेतलेले कर्ज फेडायचं कसं, याचीच चर्चा गावात सुरू असते.
■ अनेक शेतकरी भाजीपाला व दूध विक्रीचा पुरक व्यवसाय करतात. पाण्याअभावी भाजीपाला लागवडीत घट झाली आहे. चार्याअभावी दुधाळ जनावरांच्या दुधात घट होणार, हे निश्चित आहे. अल्पभूधारक शेतकरी अनेक सुशिक्षित बेकार युवक दुधाळ जनावरे घेवून दुग्धव्यवसाय करतात. चार्याअभावी त्यांनी दुधाळ जनावर विक्रीस काढली आहेत. त्यामुळे कुटुंबांचा उदरनिर्वाह कसा करावा? हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे.
■ हदगाव : दुष्काळजन्य परिस्थितीमुळे हदगाव तालुक्यातील शेतकर्यांच्या संकटात वाढ झाली. तालुक्यातील मनाठा आणि गायतोंडचे ६0 टक्के ग्रामस्थ शेतीवर अवलंबून आहेत. निसर्गाच्या पाण्यावरच ही शेती अवलंबून आहे. संपूर्ण वर्षांचे बजेट शेतीच्या उत्पन्नावर असते. आता नापिकीने आलेखच बदलला आहे. उन्हाळ्यात घरकामाला सुरुवात केलेल्या शेतकर्यांच्या घरांची कामे रखडलीे आहेत. पेरणीसाठी अर्धवट राहिलेली घरे, सिझन झाल्याने बांधणारा शेतकरी घरकाम पूर्ण कसे करणार? असा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे अनेक शेतकर्यांच्या मुलींच्या लग्नाचे नियोजन असते.
यंदा उत्पन्न नसल्याने मुलींचे लग्न कसे करणार? याची चिंता अनेकांना लागली. अनेक शेतकर्यांची मुलं उच्च शिक्षण घेत आहेत. त्यांना लागणारा शैक्षणिक खर्च कसा भागवायचा?अध्र्यावरच शिक्षण सोडून द्यावे लागेल की काय? याची भीती अनेकांना आहे./ सुनील चौरे/ हदगाव
Web Title: Decrease in milk, vegetables
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.