तूर उधळीमुळे तुरीच्या उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:14 AM2020-12-26T04:14:14+5:302020-12-26T04:14:14+5:30

तूर फुल चाफे अवस्थेत असताना सतत ढगाळ वातावरणामुळे अळीचा प्रादुर्भाव वाढला होता अनेकवेळा औषधीची फवारणी करावी लागली होती या ...

Decrease in turmeric production due to turf spillage | तूर उधळीमुळे तुरीच्या उत्पादनात घट

तूर उधळीमुळे तुरीच्या उत्पादनात घट

Next

तूर फुल चाफे अवस्थेत असताना सतत ढगाळ वातावरणामुळे अळीचा प्रादुर्भाव वाढला होता अनेकवेळा औषधीची फवारणी करावी लागली होती या संकटातून बाहेर पडले आणि मर रोगाने ग्रासले त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या कापूस सोयाबीन आधी नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता यावर्षी पाण्याची मुबलकता पाहता तालुक्यातील शेतकऱ्यांनी हरभरा पिकांचा पेरा जास्त प्रमाणात घेतला आहे खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस हातचे गेले असले तरी रब्बी हंगामातील पीके साथ देतील आशी आशा शेतकर्‍यांना आहे मात्र ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके यांच्या उत्पादन घट होण्याची शक्यता नाकारता येणार नाही .

या परिसरातील शेतकऱ्यांनी सोयाबीन कापूस पिकाबरोबर मोठ्या प्रमाणात तुरीची लागवड केली सुरुवातीपासून तुरीची वाढ जोमाने होते असल्याने यावर्षी निश्चितच उत्पन्नात वाढ होईल असा शेतकऱ्यांचा अंदाज होता मात्र शेंगा भरण्याच्या भरात असताना तूर उधळून गेली शेतकऱ्याच्या उत्पन्नाच्या अंदाजवर पाणी फिरले आहे

Web Title: Decrease in turmeric production due to turf spillage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.