शिक्षकांच्या वेतनातून कपात; २५ लाखांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:14 AM2021-06-26T04:14:01+5:302021-06-26T04:14:01+5:30

केंद्रातील शिक्षकांच्या वेतनातून दरमहा कपात होणारी एलआयसीची रक्कम शिक्षकांच्या खात्यात जमा न करणे, सर्व पतपेढ्यांची कपात रक्कम जवळ ठेवणे, ...

Deductions from teachers' salaries; Embezzlement of Rs 25 lakh | शिक्षकांच्या वेतनातून कपात; २५ लाखांचा अपहार

शिक्षकांच्या वेतनातून कपात; २५ लाखांचा अपहार

Next

केंद्रातील शिक्षकांच्या वेतनातून दरमहा कपात होणारी एलआयसीची रक्कम शिक्षकांच्या खात्यात जमा न करणे, सर्व पतपेढ्यांची कपात रक्कम जवळ ठेवणे, भाग्यलक्ष्मी बँकेची कपात रक्कम न भरणे, विद्यार्थ्यांचा उपस्थिती भत्ता वाटप न करता हडप करणे, अशाप्रकारे नजीर तांबोळी या मुख्याध्यापकाने २५ लाख ८४ हजार रुपयांचा अपहार केला. मुख्यमंत्री सहायता निधीची शिक्षकांच्या पगारातून कपात झालेली रक्कम व शिक्षकांच्या आयकराची रक्कमही त्यांनी लंपास केली. याच केंद्रातील कै. वैजनाथ सिदुसरे यांचे हैदराबाद येथील रुग्णालयात निधन झाले होते. त्यांनी त्यांच्या पगारातून नियमितपणे एलआयसीचे हप्ते कपात केले. ती कपात केलेली रक्कम कार्यालयात जमा न केल्यामुळे त्यांच्या वारसांना दावा करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. ही रक्कम त्यांना मिळण्याची आशाही धूसर झाली आहे. दरम्यान, या अपहार प्रकरणात गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापक तांबोळी यांना निलंबित केले आहे.

Web Title: Deductions from teachers' salaries; Embezzlement of Rs 25 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.