पैनगंगा नदीत उडी मारून दीर-भावजयीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:22 AM2021-09-04T04:22:43+5:302021-09-04T04:22:43+5:30
सोनाली हिला अनुक्रमे ९ आणि १३ वर्षांच्या दोन मुली आहेत. एक महिन्यापासून या दोघांचा त्यांचे कुटुंबीय शोध घेत होते. ...
सोनाली हिला अनुक्रमे ९ आणि १३ वर्षांच्या दोन मुली आहेत. एक महिन्यापासून या दोघांचा त्यांचे कुटुंबीय शोध घेत होते. हेमंत आणि सोनाली बुधवारी सायंकाळी बसने धनोडा येथे आले. त्यांनी या ठिकाणी दोन तास घालवले. बुधवारी १ सप्टेंबर रोजी रात्री ८च्या सुमारास त्यांची बॅग, पर्स आणि चप्पल पुलाजवळ आढळली. या दोघांनी पैनगंगेत उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय त्याच दिवशी व्यक्त झाला. २ सप्टेंबर रोजी नदीपात्रात त्यांचा दिवसभर शोध लागला नाही. त्यामुळे त्यांनी नदीत उडी घेतली की नाही याबाबत संभ्रम होता. ही घटना माहूर तालुक्याच्या हद्दीत येत असल्याने माहूरचे ठाणेदार नामदेव रिठे तपास करीत होते. त्यातच शुक्रवारी कापेश्वर नदी शिवारात महिलेचा तर कवठा शिवारात पुरुषाचा मृतदेह सापडल्याने घटनेला दुजोरा मिळाला. हे दोघेही सोनाली चिंचोलकर व हेमंत चिंचोलकर असल्याचेही निष्पन्न झाले.
कोट -
मयतांच्या बॅग व इतर साहित्य पैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर आढळून आल्या. हेमंत यांचा काका आणि भाऊ माहूर पोलीस स्टेशनमध्ये येऊन भेटून गेले. भद्रावती, ता.वरोरा येथील पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची तक्रार दाखल आहे. दोघांचेही प्रेत सापडले आहेत - नामदेव रिठे, पोलीस निरीक्षक, माहूर
महिलेचा मृतदेह कापेश्वर, तर पुरुषाचे कवठा शिवारात नदी काठावर सापडला. दोन्ही मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.
-भालचंद्र तिडके, सहायक पोलीस निरीक्षक, सिंदखेड
(फोटो पासपोर्ट क्र. ०३एनपीएच एसईपीटी-०९ व १० जेपीजी)