अनेक भागात निर्जळीच; धरण उशाला असूनही नांदेडकरांना रोज पाणी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:08 AM2021-08-02T04:08:09+5:302021-08-02T04:08:09+5:30

नांदेड शहराची तहान भागविणारा विष्णुपुरी प्रकल्प आजघडीला ८७ टक्के भरला आहे. त्याचबरोबर धरण क्षेत्राच्या वरील बाजूस पाऊस झाला की ...

Dehydrated in many areas; Nandedkar did not get water every day despite the dam rising | अनेक भागात निर्जळीच; धरण उशाला असूनही नांदेडकरांना रोज पाणी मिळेना

अनेक भागात निर्जळीच; धरण उशाला असूनही नांदेडकरांना रोज पाणी मिळेना

Next

नांदेड शहराची तहान भागविणारा विष्णुपुरी प्रकल्प आजघडीला ८७ टक्के भरला आहे. त्याचबरोबर धरण क्षेत्राच्या वरील बाजूस पाऊस झाला की प्रकल्पाचे दरवाजे उघडून पाणी खाली सोडून दिले जाते; परंतु आजही संपूर्ण शहराला दररोज पाणी सोडण्याचे नियोजन मनपाने केले नाही.

बळीराजा आनंदला

विष्णुपुरीत ८७ टक्के पाणीसाठा असून योग्य नियोजन केले नाही तर शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी पाणी मिळणार नाही. या प्रकल्पातून शहरासाठी संरक्षित पाणी करून उर्वरित शेतीसाठी देण्यास नियोजन करावे. - शिवाजी मोरे

विष्णुपुरीत ८७ टक्के साठा, शहराला तीन दिवसाआड पाणी

नांदेड शहर व परिसरातील नगराची तहान भागविणारे विष्णुपुरी धरण ८७ टक्के भरले आहे.

त्याचबरोबर सांगवी परिसरातील आसना बंधाराही पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.

शहरातील पाणीवाटपाचे नियोजन नसल्याने भर पावसाळ्यातही नांदेडकरांना तीन दिवसाआड पाणी दिले जाते.

शहरवासीय म्हणतात, नळाला पाणी का नाही?

जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस होऊनही नळाला दररोज आणि मुबलक प्रमाणात पाणी येत नाही. मनपाने पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. नागरिकांना नियमित पाणी देण्याबरोबरच वर्षभर पाणी कमी पडणार नाही, असे नियोजन करावे.

- सचिन आगरकर

विष्णुपुरी, आसना प्रकल्प तुडुंब भरलेले असताना केवळ महापालिकेकडे नियोजन नसल्याने नांदेडकरांना ऐनपावसाळ्यातही निर्जळीचा सामना करावा लागत आहे. शहरातील तरोडा भागात अनेक नगरात उच्च दाबाने पाणीपुरवठा होत नाही. अशीच परिस्थिती जुन्या नांदेडातील आहे. पाण्याचे योग्य नियोजन हवे.

- संदीप पावडे, तरोडा

Web Title: Dehydrated in many areas; Nandedkar did not get water every day despite the dam rising

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.