कोरोनावरील उपचार मोफत करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:18 AM2021-05-09T04:18:33+5:302021-05-09T04:18:33+5:30

जनता दलाचे सोमवारी उपोषण नांदेड- लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गरीब कुुटुंबांना आर्थिक मदत देण्याची मागणी जनता दलाच्यावतीने करण्यात आली आहे. याच ...

Demand for free treatment of corona | कोरोनावरील उपचार मोफत करण्याची मागणी

कोरोनावरील उपचार मोफत करण्याची मागणी

Next

जनता दलाचे सोमवारी उपोषण

नांदेड- लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गरीब कुुटुंबांना आर्थिक मदत देण्याची मागणी जनता दलाच्यावतीने करण्यात आली आहे. याच मागणीसाठी १० मे रोजी जनता दलाच्यावतीने उपोषणही करण्यात येणार आहे. गरीब कुटुंबांना १० हजार रुपये आर्थिक मदत तातडीने द्यावी, अशी मागणी डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, डॉ. किरण चिद्रावार, मोहमद पठाण, सूर्यकांत वाणी, लक्ष्मण शिंदे, बालाजी आलेवार, अर्चना पारळकर आदींनी केली आहे.

मोफत वैद्यकीय सेवेची मागणी

नांदेड- कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. हे उपचार परवडणारे नसून आंध्र प्रदेश सरकारच्या धर्तीवर सर्व कोरोना रुग्णावर मोफत उपचार करण्याची मागणी जनता दल सेक्युलरच्यावतीने प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनी केली आहे.

मध्यवर्ती बसस्थानकात खड्डे

नांदेड- शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात ठिकठिकाणी खड्डे पडले असून पावसामुळे हे खड्डे भरत आहेत. त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरत आहे. लॉकडाऊनमुळे प्रवासी बसस्थानकात नसल्याने स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे.

वडगाव आरोग्य केंद्रात लसीकरण

नांदेड- तालुक्यातील वडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १६०० जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणाबाबत ग्रामीण भागात जनजागृती केल्याने लसीकरणाचे प्रमाण वाढत असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय कसबे यांनी सांगितले.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिर

नांदेड - शहर व जिल्ह्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असून लसीकरणदेखील करण्यात येत आहे; परंतु लसीकरणानंतर दोन महिने रक्तदान करता येत नसल्याने भविष्यात रक्ताचा तुटवडा भासण्याची शक्यता असल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्यावतीने १० मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात रक्तदात्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांनी केले आहे. शहरातील बाफना ब्रिज रेणुकाई हॉस्पिटलच्या बाजूस असलेल्या सचिन गॅरेज येथे सकाळी ९ ते ४ पर्यंत हे रक्तदान शिबिर करण्यात आले आहे.

पावसामुळे फळबागांचे नुकसान

नांदेड- जिल्ह्यात सध्या अनेक भागांत वादळी वाऱ्यांसह पाऊस होत आहे. या वादळी पावसाने फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या पावसामुळे आंबा, टरबूज, पपई, खरबूज, केळी आदी फळबागांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली जात आहे.

Web Title: Demand for free treatment of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.