पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:14 AM2020-12-26T04:14:32+5:302020-12-26T04:14:32+5:30
गेल्या १८ ते १९ वर्षांपासून उमरी तालुक्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचारी शासकीय नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. पदवी- पदव्युत्तर ...
गेल्या १८ ते १९ वर्षांपासून उमरी तालुक्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचारी शासकीय नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. पदवी- पदव्युत्तर तसेच व्यावसायिक स्वरूपाचे शिक्षण घेतलेले आहे. अनेक पदवीधर हे आजही शासकीय नोकरीत आपापल्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्या पदावर काम करण्यास सक्षम आहेत. असे असतानाही शासनातर्फे बाह्य यंत्रणेमार्फत कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कंत्राटी पद्धतीने कामावर घेतले जात आहे. शासनाकडे नोंदणी असलेले पदवीधर अंशकालीन कर्मचारी हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असताना बाह्य यंत्रणेमार्फत कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याची गरज नाही. अनुभव तसेच शैक्षणिक पात्रता असणाऱ्या पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी तहसीलदारामार्फत महाराष्ट्र शासनाकडे करण्यात आली आहे.