इम्युनिटी वाढविणाऱ्या तुळस, अश्वगंधाच्या रोपांना मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:18 AM2021-05-06T04:18:49+5:302021-05-06T04:18:49+5:30

चाैकट- दोन महिन्यांपासून तुळशीच्या रोपट्यांची मागणी वाढली आहे. सध्या अश्वगंधाची रोपटी संपली आहेत. मात्र, नागरिक या रोपट्यांची मागणी ...

Demand for Immune Booster Basil, Ashwagandha plants | इम्युनिटी वाढविणाऱ्या तुळस, अश्वगंधाच्या रोपांना मागणी

इम्युनिटी वाढविणाऱ्या तुळस, अश्वगंधाच्या रोपांना मागणी

Next

चाैकट-

दोन महिन्यांपासून तुळशीच्या रोपट्यांची मागणी वाढली आहे. सध्या अश्वगंधाची रोपटी संपली आहेत. मात्र, नागरिक या रोपट्यांची मागणी करत आहेत. त्यामुळे आम्ही तुळशीची रोपटी अधिक आणली आहेत.

- शेख अनवर, भारत नर्सरी, नांदेड.

चौकट -

कोरोनामुळे नागरिक तुळशीचे रोपटे मागत आहेत. गेल्या काही दिवसांपासून नागरिक तुळशीचे रोपटे घेऊन जात आहेत. तसेच अश्वगंधा व गुळवेलचीही मागणी करत आहेत. मात्र, ही रोपटी आमच्याकडे नाहीत. - सदाशिव शिंदे, मालेगावरोड.

या पाच रोपांना वाढली मागणी

तुळस - तुळस हे औषधी गुणांनी भरलेले एक बहुपयोगी रोपटे आहे. यात जीवनसत्व अ, ब आणि अनेक पोषके आहेत. सर्दी, खोकला, ताप, दंतदुखी, श्वासारोध, दमा, फुप्फुसांचे रोग यासाठी सर्वांमध्ये तुळस वापरली जाते. तुळशीची ताजी पाने खाल्ल्यास सर्दी, खोकला बरा होतो. त्यासाठी तुळशीच्या रोपांची मागणी वाढली आहे.

अश्वगंधा - अश्वगंधाचे अनेक फायदे असून, रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग अधिक होतो. सर्दी, खोकला या आजारापासून अश्वगंधा दूर ठेवते. कोरोना काळात नागरिक अश्वगंधाच्या रोपट्यांची मागणी करीत आहेत. मात्र, शहरातील नर्सरीत अश्वगंधाचे रोपटे उपलब्ध नसल्याचे नर्सरी मालकांनी सांगितले.

गुळवेल - रोगप्रतिकारक क्षमता वाढविणाऱ्या गुळवेलचे अनेक फायदे आहेत. कोरोना काळात गुळवेलच्या पानांची मागणी अधिक आहे. गुळवेलच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म असतात, ज्यामुळे ते तुमचे सर्दीपासून डायबीटीजपर्यंत सर्व आजारांपासून बचाव करते. गुळवेलच्या पानांचा रस नियमित पिण्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते. तसेच शरीर निरोगी राहते.

पुदिना - पुदिनाचा उपयोग विशेषता मंजन, टुथपेस्ट, माऊथ फ्रेशनर, आदींसाठी केला जातो. तसेच श्वासनलिकेतील सूज, कानाचे आजार, अपचन, पोटदुखी, अस्थमा, मूत्रविकार यासाठी पुदिना वापरला जातो. कोरोनामुळे सध्या बाजारात पुदिनाची मागणी वाढली आहे. काहींनी आपल्या परसबागेत पुदीनाचे रोपटे लावले आहे.

Web Title: Demand for Immune Booster Basil, Ashwagandha plants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.