रमाई घरकुल योजनेत वरच्या माळ्यात घरकुलाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:16 AM2021-02-08T04:16:03+5:302021-02-08T04:16:03+5:30

जागेअभावी वरच्या माळ्यावर (छतावर) घरकुल देण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे मंगेश कदम यांनी केले आहे. शहरात ...

Demand for upstairs gharkula in Ramai gharkul scheme | रमाई घरकुल योजनेत वरच्या माळ्यात घरकुलाची मागणी

रमाई घरकुल योजनेत वरच्या माळ्यात घरकुलाची मागणी

Next

जागेअभावी वरच्या माळ्यावर (छतावर) घरकुल देण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे मंगेश कदम यांनी केले आहे.

शहरात तरोडा परिसरात २००९ साली बीएसयूपी योजनेंतर्गत नागरिकांना घरकुल बांधून देण्यात आले. त्या काळात त्या लाभार्थ्यांच्या कुटुंबीयांची संख्या कमी होती. परंतु आज काळी त्या कुटुंबीयांची संख्या वाढली असून अनेकांचा मुलांची लग्ने झाली असल्याने कुटुंबाची सदस्य संख्या वाढली आहे. त्यामुळे त्या लाभार्थ्यांना सध्याची जागा अपुरी पडत आहे. महानगरपालिका आयुक्तांना संबंधित प्रकरणी आदेशीत करून सदरील घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना घराच्या छतावर दुसरे घरकुल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी पालकमंत्री चव्हाण यांच्याकडे नगरसेवक प्रतिनिधी मंगेश कदम, काँग्रेस शहर महासचिव ॲड. धम्मपाल कदम, माजी सरपंच अरविंद सरपाते, युवक काँग्रेसचे विक्की गायकवाड यांनी केली आहे.

Web Title: Demand for upstairs gharkula in Ramai gharkul scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.