डेंग्यूमुळे प्लेटलेटसाठी आता लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:22 AM2021-08-21T04:22:43+5:302021-08-21T04:22:43+5:30
सिंगल डोनर प्लेटलेटस् महागडी सिंगल डोनर प्लेटलेटस्द्वारे ३० ते ५० हजारापर्यंत प्लेटलेटस् वाढू शकतात; परंतु त्यासाठी तब्बल अकरा ते ...
सिंगल डोनर प्लेटलेटस् महागडी
सिंगल डोनर प्लेटलेटस्द्वारे ३० ते ५० हजारापर्यंत प्लेटलेटस् वाढू शकतात; परंतु त्यासाठी तब्बल अकरा ते साडेबारा हजार रुपये मोजावे लागतात, तर रँडम डोनर प्लेटलेटस्मध्ये पाच हजार प्लेटलेटस् वाढतात. त्यासाठी आठशे ते हजार रुपये घेतले जातात.
लहान बालकांची घ्या काळजी
सध्या एक वर्षाखालील लहान बालकांमध्ये न्यूमोनियाचे प्रमाण अधिक आहे, तसेच सर्दी, खोकला आणि डेंग्यूचे रुग्णही आढळून येत आहेत. त्यामुळे या काळात लहान मुलांना थंड पाणी, थंड फळे देऊ नयेत. पाण्यात खेळू देऊ नका. ज्या ठिकाणी गर्दी आहे, अशा ठिकाणी नेऊ नका. जेणेकरून बालकाला कोणताही संसर्ग होईल. सध्या नायगाव, मुखेड, देगलूर यासह नांदेड तालुक्यातून असे रुग्ण खूप येत असल्याची माहिती विभागप्रमुख डॉ. सलीम तांबे यांनी दिली.