प्रसूतिशास्र विभागाचा गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:43 AM2021-01-13T04:43:23+5:302021-01-13T04:43:23+5:30
जिल्हा रुग्णालयात प्रसूतीचे प्रमाण ३०.७ टक्क्यावरून ७८.९ टक्के एवढे वाढले आहे. लक्ष कार्यक्रमांतर्गत सर्व शासकीय महाविद्यालयांमधील व इतर संस्थांमधील ...
जिल्हा रुग्णालयात प्रसूतीचे प्रमाण ३०.७ टक्क्यावरून ७८.९ टक्के एवढे वाढले आहे. लक्ष कार्यक्रमांतर्गत सर्व शासकीय महाविद्यालयांमधील व इतर संस्थांमधील प्रसूतिगृहातील व इमर्जन्सी ऑपरेशन थिएटरमधील सुविधा सुसज्ज व अद्ययावत करणे, हाय डिपेन्डन्सी युनिट, गंभीर रुग्णांसाठी ऑबस्टेस्ट्रिक आयसीयू तसेच नवजात बालकांसाठीच्या सुविधा अद्ययावत करणे याकडे लक्ष देण्यात आले.
येथील स्रीरोग व प्रसूतिगृहातील सोईसुविधांची तपासणी गुणांकन करणाऱ्या पथकाने ९६ टक्के एवढे गुण देऊन आपल्या येथील प्रसूतीसंबंधित रुग्णसेवा ही अत्यंत अद्ययावत व दर्जेदार असल्याचे शिक्कामोर्तब केले आहे.
स्रीरोग व प्रसूतिशास्र विभागप्रमुख डॉ. श्यामराव वाकोडे यांच्या अधिपत्याखाली कार्यरत डॉ. फसिहा तसनीम, डॉ. शिरीष दुलेवाड, डॉ. जयदीप सोळंके, डॉ. स्वाती कापसीकर, डॉ. मेघा झरीकर, सर्व निवासी डॉक्टर्स प्रसूतिगृहातील कार्यरत सर्व नर्सिंग स्टाफ व चतुर्थश्रेणी कर्मचारी यांचे अविरत कार्य आहे.