माहूर शेतकऱ्यांचे आपत्कालीन अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:54 AM2021-01-08T04:54:29+5:302021-01-08T04:54:29+5:30

यावेळी आ. अमरनाथ राजूरकर, नामदेवराव केशवे, आ. मोहन हंबर्डे, अमोल केशवे यांची उपस्थिती होती. तालुक्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस व ...

Deposit emergency subsidy of Mahur farmers directly in the bank account of the farmer | माहूर शेतकऱ्यांचे आपत्कालीन अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करा

माहूर शेतकऱ्यांचे आपत्कालीन अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करा

googlenewsNext

यावेळी आ. अमरनाथ राजूरकर, नामदेवराव केशवे, आ. मोहन हंबर्डे, अमोल केशवे यांची उपस्थिती होती.

तालुक्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस व नैसर्गिक आपत्तीबाबत शासनाकडून घोषित करण्यात आलेल्या अनुदानाच्या रक्कम नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतून शेतकऱ्यांना अल्फाबेटिकल क्रमवारीनुसार गावाचे नंबर लावून वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे त्या त्या दिवशी बँकेत अर्थसाहाय्य उचल करण्यासाठी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. कोरोना माहामारी अद्याप आटोक्यात आलेली नसून बचावासाठी पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित करण्याची स्थिती उद्भवत असल्याचे वरिष्ठ प्रशासनाकडून संकेत मिळत आहेत.

या बाबीकडे पाहू जाता माहूरच्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत होत असलेली गर्दी व पालन करण्यात येत नसलेले प्रिकॉशन यासाठी बँकेत शेतकऱ्यांची गर्दी होऊ नये यासाठी उपाय योजना करणे आवश्यक असून, सदर रक्कम शेतकऱ्यांना बँकेतून वाटप करण्याऐवजी प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात वर्ग करून दिल्यास शेतकरी आपापल्या सोयीनुसार आपल्या बँक खात्यातून रक्कम उचल करून घेतील व बँकेत होत असलेली अमाप गर्दी होणार नाही व बँकेलाही दैनंदिन कामकाज करणे सोयीचे होईल. तेव्हा शेतकऱ्यांचे आपत्कालीन मदत अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे बँकेला आदेशित करून कोरोना महामारीच्या प्रसाराचा वाढता धोका टाळण्यासाठी प्रशासनास आदेशित करण्याची विनंती निवेदनात केली आहे.

Web Title: Deposit emergency subsidy of Mahur farmers directly in the bank account of the farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.