चिमेगाव येथील ‘त्या’ वाळू कारखान्याची होणार सखोल चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:32 AM2018-05-28T00:32:43+5:302018-05-28T00:32:43+5:30

In-depth inquiry into 'She' sand factory at Chmegaon | चिमेगाव येथील ‘त्या’ वाळू कारखान्याची होणार सखोल चौकशी

चिमेगाव येथील ‘त्या’ वाळू कारखान्याची होणार सखोल चौकशी

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारी : गुन्हा दाखल करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : तालुक्यातील चिमेगाव येथील अनधिकृतपणे चालणाऱ्या वाळू दळण्याच्या कारखान्यावर शनिवारी महसूल प्रशासनाकडून कारवाई करीत कारखाना जप्त केला़ दरम्यान, जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी रविवारी सदर कारखाना तसेच परिसराची पाहणी करून सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले़ यासंदर्भातील तपास पोलिसांकडे देणार असल्याचे जिल्हाधिकारी डोंगरे यांनी सांगितले़
आठवडाभरापासून तहसीलदार किरण अंबेकर यांच्या पथकाने अवैध गौण खनिज उत्खनन करणाºया आणि वाळूची अनधिकृत वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाईची मोहीम हाती घेतली होती़ दरम्यान, चिमेगाव येथे अनधिकृतपणे चालणाºया वाळू दळण कारखान्यावर तहसीलदार अंबेकर यांनी धाडसी कारवाई केली़
यामध्ये वाळू, ट्रॅक्टर, कारखाना जप्त करण्यात आला होता़ सदर कारवाई उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात तहसीलदारांच्या पथकाने केली़ यामध्ये चिमेगाव येथील गट क्र.५२. ५५ व ५८ मधील बालाजी शंकरराव नळगे यांच्या शेतातील कोणतीही परवानगी नसलेला वाळू दळण्याचा कारखाना जप्त केला़ यामध्ये २ फ्लोअर मिल, १० ब्रास वाळू, १५०० पोती दळलेली वाळू, टिप्पर (क्र. एमएच-२६-एपी-२२०) व (एमएच-२६-के-९९१८) क्रमांकाचा ट्रॅक्टर जप्त केला. दरम्यान, सदर कारखान्याची जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी पाहणी केली़
यावेळी उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, तहसीलदार किरण अंबेकर, नायब तहसीलदार मुगाजी काकडे, मंडळ अधिकारी अनिरुद्ध जोंधळे, पठाण, लिंबगाव ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर आदींची उपस्थिती होती़
सदर कारखान्यासाठी वापरण्यात येणाºया वाळूची रॉयल्टी भरलेली आहे काय, वीजजोडणी कोणत्या प्रकारची आहे, सदर वाळूचे पीठ करून ते कशासाठी वापरले जात आहे? आदी बाबींचा तपास करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डोंगरे यांनी दिले़ तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे उत्खनन झाले असून त्याची चौकशी करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी दिले आहेत.
---
दरम्यान, सदर कारखान्यात वाळू दळून ती घरबांधकामासाठी विक्री केली जात असल्याचे कारखानाचालक नळगे यांनी सांगितले़ परंतु, याठिकाणी सिमेंटची पोती, तसेच पीठाप्रमाणे बारीक दळलेली वाळू आणि पीठ गिरणी आढळून आले आहेत़ त्यामुळे सदर वाळू खाद्यपदार्थ अथवा सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापरली जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्यादृष्टीने तपास करण्यात येईल.

Web Title: In-depth inquiry into 'She' sand factory at Chmegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.