बिलोली तालुक्यात पिकांची नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:50 AM2021-02-20T04:50:25+5:302021-02-20T04:50:25+5:30
अचानक पडलेल्या पावसामुळे रब्बी, गहू, आंबा, टरबूज, भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले. शिवाय ज्या शेतकऱ्यांनी मळणी करण्यासाठी कापून ठेवलेली ...
अचानक पडलेल्या पावसामुळे रब्बी, गहू, आंबा, टरबूज, भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले. शिवाय ज्या शेतकऱ्यांनी मळणी करण्यासाठी कापून ठेवलेली हरभरा, तूर पिके ओलीचिंब झाली. त्यामुळे हातातोंडाला आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून नेला. मात्र, पावसामुळे टरबुजावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव झालेला असून कारले, दोडके, टोमॅटो या फळभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यात अचानक झालेल्या पावसाने रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान केले. मळणी केलेली तूर, हरभरा पिकेही ओलीचिंब झाली. वाऱ्यामुळे आम्रवृक्षाचा बहर गळून पडला, तर कासराळी, सगरोळी, बडूर परिसरातील फळांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्व्हे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी माजी नगरसेवक लक्ष्मण शेट्टीवार यांनी केली आहे. अचानक पडलेल्या पावसामुळे माझ्या दोन एकर शेतातील ज्वारीचे नुकसान झाले असून, भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी शंकर गोगरोड यांनी केली आहे.