ग्रामीण भागातील रस्त्यांचे उजळणार भाग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 11:43 PM2018-12-07T23:43:09+5:302018-12-07T23:46:23+5:30

जिल्ह्यात विविध ठिकाणी महामार्गाचे काम प्रगतीपथावर असले तरी ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था होती. मात्र या रस्त्यांचेही भाग्य आता उजळणार आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ५१ रस्त्यांच्या दर्जोन्नतीला प्रशासकीय मान्यता मिळाली असून ६४ कोटी २० लाख रुपये किमतीच्या या कामांना लवकरच मुहूर्त मिळणार आहे.

Destruction of road in rural areas | ग्रामीण भागातील रस्त्यांचे उजळणार भाग्य

ग्रामीण भागातील रस्त्यांचे उजळणार भाग्य

googlenewsNext
ठळक मुद्देमुख्यमंत्री ग्रामसडक योजना ५१ रस्ते कामांसाठी ६४ कोटींचा निधी मंजूर, १२४ किमीची दर्जोन्नती

विशाल सोनटक्के ।
नांदेड : जिल्ह्यात विविध ठिकाणी महामार्गाचे काम प्रगतीपथावर असले तरी ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था होती. मात्र या रस्त्यांचेही भाग्य आता उजळणार आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ५१ रस्त्यांच्या दर्जोन्नतीला प्रशासकीय मान्यता मिळाली असून ६४ कोटी २० लाख रुपये किमतीच्या या कामांना लवकरच मुहूर्त मिळणार आहे.
मराठवाड्यातील १०८४ किमीच्या कामांना केंद्रस्तरावर मंजुरी मिळाली असून एकूण २३४८ कि.मी.चा राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार औरंगाबाद, जळगाव, नांदेड, तुळजापूर ते नांदेड, वारंगाफाटा यासह इतर महामार्गांची कामे मार्गी लागत आहेत. मात्र दुसरीकडे ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत होती. मात्र मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सन २०१८-१९ या वित्तीय वर्षात नांदेड जिल्ह्यातील ५१ रस्त्यांची दर्जोन्नती करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला असून या कामांना प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे.
यात नांदेड तालुक्यातील नांदेड ते पावडेवाडी (लांबी २.६), प्रमुख जिल्हा मार्ग २२ ते आलेगाव (लांबी १.६), प्रमुख राज्य मार्ग ६ ते मुजामपेठ (लांबी १ कि.मी.), राज्य मार्ग २५६ ते बाभूळगाव (लांबी ०.७), प्रमुख जिल्हा मार्ग २८ ते गंगाबेट (लांबी १.६), ग्रामीण मार्ग ४० ते इंजेगाव (लांबी १.२), या सहा रस्तेकामाचा समावेश आहे. धर्माबाद तालुक्यातील तीन कामांनाही मान्यता देण्यात आली आहे. यात राज्य मार्ग २५१ ते आटाळा (लांबी २.५७), राज्य मार्ग २६० ते समराळा (लांबी ३.४), प्रमुख जिल्हा मार्ग ८३ ते पाटोदा खुर्द (लांबी ३.३४) या रस्त्यांचा समावेश आहे. तर माहूर तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग ६ ते शिवूर (लांबी ३ कि.मी.), राज्य मार्ग २६५ ते पापनवाडी (लांबी १.३३), राज्य मार्ग- २६५ ते हिवळणी (लांबी ०.९६), प्रमुख जिल्हामार्ग ५ ते पोवनाळा वरचे (लांबी ५ कि.मी.) आणि राज्य मार्ग २६५ ते जगूनाईक तांडा (लांबी ०.७०) या पाच कामांचा समावेश आहे.
मुदखेड तालुक्यातील राज्य मार्ग २६१ ते वाडी मुख्त्यार (लांबी ३), प्रमुख जिल्हा मार्ग ते राजवाडी (लांबी ३.५) आणि लिंकरुट ०.४ ते पिंपळकौठा (लांबी १.५). या कामांना मान्यता देण्यात आली आहे. हिमायतनगर तालुक्यात प्रमुख राज्य मार्ग १० ते पारवा खुर्द (लांबी १ कि.मी.), प्रमुख राज्य मार्ग १० ते पोटा तांडा (लांबी ५), प्रमुख राज्यमार्ग १० ते वडगाव जिरोणा (लांबी ४.५), राज्य मार्ग २६३ ते रमणवाडी चिंचोडी (लांबी ३ कि.मी.) या कामांचा समावेश आहे.
किनवट तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग १० ते मार्लागुडा- कंचोली- अंदबोरी- मळकजांब (लांबी ११.२२), प्रमुख राज्य मार्ग १० ते नंदगाव कुपटी (लांबी ६.५). इतर जिल्हा मार्ग १२ ते गोंडेमहागाव (लांबी २.५), राज्य मार्ग २६५ ते कुपटी बु. (लांबी ०.५), राज्य मार्ग २६५ ते तलारी तांडा (लांबी ०.५), प्रमुख राज्य मार्ग १० ते बुरकुलवाडी (लांबी ०.५), इतर जिल्हा मार्ग १२ ते मारलगुडा तांडा (लांबी ०.५), प्रमुख जिल्हा मार्ग-६ ते पांढरा (लांबी १), राज्य मार्ग २६७ ते लोणी (लांबी ०.५), प्रमुख राज्य मार्ग १० ते सिरमिती (लांबी १.५), राज्य मार्ग २६८ ते देवलाई नाईक तांडा (लांबी १.७), प्रमुख जिल्हा मार्ग ६ ते डोंगरगाव सिंग (लांबी १.७), प्रमुख जिल्हा मार्ग- ६ ते अंजी (लांबी ०.८), प्रमुख जिल्हा मार्ग-६ ते बेलोरी (लांबी १ कि.मी.) या १४ कामांचा समावेश आहे.
अर्धापूर तालुक्यातील ३ कामांना मंजुरी मिळाली असून यात राज्य मार्ग २२२ ते सेलगाव (लांबी २.५), प्रमुख जिल्हा मार्ग-६ ते पांगरी, कारवाडी (लांबी २.८) आणि राज्य मार्ग २२२ ते खैरगाव (खु) (लांबी १.५) या तीन कामांचा समावेश आहे. हदगाव तालुक्यातील ९ रस्ते कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यात राज्य मार्ग २५९ ते नेवरवाडी (लांबी ५), राज्य मार्ग २६३ ते शेट्याची वाडी (लांबी १.२), प्रमुख राज्य मार्ग ६ ते गारगव्हाण (लांबी ५), राज्य मार्ग २६३ ते वायफना (लांबी ३.७), राज्य मार्ग १५१ ते हडसणी (लांबी १.८), राज्य मार्ग २६० ते चक्री (लांबी ०.८), प्रमुख जिल्हा मार्ग १३ ते वाकी (लांबी ४ कि.मी.), शिरड ते मटाळा (लांबी २.५), प्रमुख जिल्हा मार्ग ३५ ते बोळसा नं. २ (लांबी १.६),
उमरी तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग ८३ ते बोरजुनी (लांबी १.९) आणि प्रमुख जिल्हा मार्ग ४० ते हिरडगाव (लांबी १ कि.मी.) या दोन कामांचा समावेश आहे तर भोकर तालुक्यातील राज्य मार्ग २२२ पोवनाळा जांमदरीतांडा (लांबी ५.५) आणि राज्य मार्ग २२२ खडकी (लांबी २.५) या दोन रस्त्यांचा समावेश आहे. वरीलप्रमाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील १२४ कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे दर्जोन्नती करण्यात येणार असल्याने हे रस्ते चकाचक होणार आहेत.
निर्देश : ई-टेंडरिंग करुनच कार्यारंभ आदेश द्या
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत १२४ कि.मी. च्या ५१ कामांना ग्रामविकास विभागाने प्रशासकीय मान्यता दिली असून या कामांची अंदाजित रक्कम ६४ कोटी २० लाख ७१ हजार रुपये एवढी आहे. याबरोबरच या कामांच्या पाच वर्षे नियमित देखभाल दुरुस्तीसाठी ४ कोटी ३२ लाख ७४ हजार रुपयांची अंदाजित रक्कमही ग्रहीत धरण्यात आली आहे. दरम्यान, सदरील रस्त्यांची कामे कुठल्याही परिस्थितीत ई-टेंडरिंग करुनच सुरू करावीत, असे स्पष्ट आदेशही शासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.

Web Title: Destruction of road in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.