Devendra Fadanvis: "मोदींनी केवळ 3 दिवसांत 2300 कोटींची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी दिली"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 12:24 PM2022-04-14T12:24:58+5:302022-04-14T12:26:07+5:30
मी मुख्यमंत्री असताना रामदास आठवले यांच्यासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला गेलो
नांदेड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती आज देशभरात साजरी होत आहे. विदेशात असेलल्या भारतीयांकडूनही मोठ्या उत्साहात महामानवास अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत दिग्गजांनीही त्यांच्या प्रतिमेला वंदन करत आंदरांजली वाहिली. मोदींनी ट्विट करुन अभिवादन केले, तर फडणवीस यांनीही बाबासाहेबांच्या स्मृती जागवल्या आहेत. नांदेड येथील पुतळा अनावरण कार्यक्रमात फडणवीस यांनी मुंबईतील इंदू मिलच्या जागी होत असलेल्या बाबासाहेबांच्या भव्य स्मारकाची माहिती दिली. मोदींनी केवळ 3 दिवसांत ही जागा राज्य सरकारला दिल्याचं त्यांनी सांगितलं.
मी मुख्यमंत्री असताना रामदास आठवले यांच्यासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला गेलो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बांधण्यासाठी इंदू मिलची जागा महाराष्ट्र सरकारला देण्याची विनंती पंतप्रधानांकडे केली. त्यावेळी, मोदींनी लगचेच संबंधित सविवांना, मंत्र्यांना बोलावून घेतलं. केवळ 3 दिवसांत ही जागा महाराष्ट्र सरकारला द्या, असे आदेशच मोदींनी दिल्याचे विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड येथील पुतळा अनावरण कार्यक्रमात बोलताना सांगितले.
दलितों, पीड़ितों, वंचितों और शोषितों के कल्याण के लिए बाबासाहेब के विचार हमारी सरकार के लिए प्रेरणापुंज रहे हैं। यही वजह है कि हमारी सभी योजनाएं गरीब से गरीब को ध्यान में रखकर लागू की गई हैं और सामाजिक न्याय की दिशा में हमने कई मानदंड तय किए हैं। pic.twitter.com/dOJixnlLOj
— Narendra Modi (@narendramodi) April 14, 2022
केवळ तीनच दिवसांत 2300 कोटी रुपयांची मुंबईतील इंदू मिलची जागा महाराष्ट्र सरकारला हस्तांतरण करण्यात आली. या हस्तांतरणानंतर आम्ही भूमिपूजन करुन बाबासाहेबांच्या हजारो कोटी रुपयांच्या स्मारकाचे काम सुरू केल्याचेही फडणवीस यांनी म्हटले. कोरोनाच्या काळात, या सरकारच्या काळात स्मारकाचं काम संथ गतीने सुरु आहे. पुढच्या वर्षात ते स्मारक होईल, किंवा त्याच्या पुढच्या वर्षात होईल. पण, मोदींकडे गेल्यानंतर मोदीजी नेहमीच सांगतात. मी पंतप्रधान आहे, तो केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच, अशी आठवणही फडणवीस यांनी या कार्यक्रमात करुन दिली.