धनगर समाजाचे राज्यभर आंदोलन, ९१ एल्गार मोर्चे निघणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:25 AM2019-01-28T00:25:02+5:302019-01-28T00:26:11+5:30

महाराष्ट्रात दोन कोटींपेक्षा जास्त धनगर समाज असून हा समाज पूर्वीपासूनच भटके व आदिवासी जीवन जगत आला आहे़ या समाजाच्या उन्नतीसाठी आरक्षणाची नितांत गरज आहे़ यासाठी धनगर आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन व ९१ एल्गार मोर्चे निघणार आहेत, अशी माहिती धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दिली.

Dhangar Samaj's state-wide agitation, 91 elephants will go to the front | धनगर समाजाचे राज्यभर आंदोलन, ९१ एल्गार मोर्चे निघणार

धनगर समाजाचे राज्यभर आंदोलन, ९१ एल्गार मोर्चे निघणार

Next
ठळक मुद्देधनगर आरक्षण एल्गार मेळावा, हजारोंचा जनसमुदाय मेळाव्याला उपस्थित

मुखेड : महाराष्ट्रात दोन कोटींपेक्षा जास्त धनगर समाज असून हा समाज पूर्वीपासूनच भटके व आदिवासी जीवन जगत आला आहे़ या समाजाच्या उन्नतीसाठी आरक्षणाची नितांत गरज आहे़ यासाठी धनगर आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन व ९१ एल्गार मोर्चे निघणार आहेत, अशी माहिती धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दिली.
मुखेड धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने शहरातील जि.प हायस्कूल मुलींची शाळा येथे २७ जानेवारी रोजी धनगर आरक्षण एल्गार मेळावा घेण्यात आला. या वेळी जिल्हाभरातून हजारोंचा पिवळा जनसागर उपस्थित झाला होता. कार्यक्रमास धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर, माजी जि़प़अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे, प्रा.डॉ. यशपाल भिंगे, धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब मंडलापूरकर, सचिव डॉ.रामराव श्रीरामे, सभापती अशोकराव पाटील रावीकर, जि़प़सदस्या गंगासागर सुगावकर, विजय पाटील सुगावकर, माजी नगरसेवक जगन्नाथ कामजे, अ‍ॅॅड़शिवराज पाटील कुंद्राळकर, माणिकराव लोहगावे, चंद्रसेन पाटील, दिलीप बंदखडके उपस्थित होते. पडळकर म्हणाले की, सत्ताधारी सरकारने धनगर समाजाला आरक्षण देणार असे आश्वासन दिले होते, मात्र साडेचार वर्षे झाली, आरक्षण मात्र देण्यात आले नाही, असे सांगून सरकारला जागविण्यासाठी आंदोलन करणार असल्याचे नमूद केले.
यावेळी उपस्थितांची भाषणे झाली. प्रास्ताविक भाऊसाहेब पाटील मंडलापूरकर तर सूत्रसंचालन बालाजी नाईक व शिवाजी कोनापुरे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी पं.स. सदस्य व्यंकटराव दबडे, डॉ. पांडुरंग श्रीरामे, संभाजी पा. मावलीकर, जयवंत तरंगे, काशीनाथ येवते, पप्पू इमडे, व्यंकटराव पा. बेन्नाळकर, संजयसिंह देवकते, व्यंकटराव पा. हाळणीकर, उमेश इमडे, संभाजी मुकनर, विठ्ठलराव देवकते, हणमंत नरोटे, गणेश बिरु, सचिन श्रीरामे, माधव देवकते यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Dhangar Samaj's state-wide agitation, 91 elephants will go to the front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.