धर्माबादेत पेट्रोलच्या दराने ओलांडली शंभरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:50 AM2021-02-20T04:50:30+5:302021-02-20T04:50:30+5:30
चौकट- राज्यात मुंबई, मनमाड, धुळे, अकोला, चंद्रपूर, खापरी, सोलापूर या ठिकाणाहून पेट्रोल आणि डिझेल वितरित केले जाते. पेट्रोलियम पदार्थावर ...
चौकट- राज्यात मुंबई, मनमाड, धुळे, अकोला, चंद्रपूर, खापरी, सोलापूर या ठिकाणाहून पेट्रोल आणि डिझेल वितरित केले जाते. पेट्रोलियम पदार्थावर एकुण नऊ प्रकारचा टॅक्स लावला जातो. त्यात रिडक्शन ऑदर्स, आरपीओ फॅक्टर (रिटेल किमंत आणि त्यातील तफावत), लोकल ट्रान्सपोर्ट चार्जेस (जर पेट्रोल वितरण केंद्रापासून पेट्रोल पंप १० किमीच्या आत असेल तरीही तेवढाच टॅक्स त्या पम्पाला द्यावा लागतो.), ट्रान्सपोर्टेशन चार्ज (जर पेट्रोल वितरण केंद्रापासून पेट्रोल पंप १० किमी पेक्षा जास्त असेल तर लोकल ट्रान्सपोर्टेशन चार्जेस व १.७५ पैसे प्रति लिटर आकारले जातात.) साधारणता एक टँकर १२ हजार लिटरचा असतो. ऑदर लिव्हाईज (पेट्रोल वितरण केंद्रापासून पेट्रोल पंपापर्यंत जे टोल नाके लागतात त्याचा यात समावेश असतो.) एआर व्हॅट (व्हॅल्यू ॲडेड टॅक्स हा तब्बल २५ टक्के आहे), सरचार्ज ऑन सेल टॅक्स (विक्री करावरील अधिकचा कर), लायसन्स फी रिकव्हरी (पेट्रोल पंपाचे जे डेकोरेशन केले जाते तो हा टॅक्स आहे.) एलबीटी, जकात, स्थानिक कर याचा यात समावेश असतो.