धर्माबाद तालुक्यात २ हजार हेक्टर तूर धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 01:05 AM2018-12-13T01:05:54+5:302018-12-13T01:06:24+5:30
पाच दिवसापासून असलेले ढगाळ वातावरण आणि आर्द्रतेच्या अभावामुळे हाताशी आलेल्या तुरीच्या पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची भीती व्यक्त होत आहे.
धर्माबाद : पाच दिवसापासून असलेले ढगाळ वातावरण आणि आर्द्रतेच्या अभावामुळे हाताशी आलेल्या तुरीच्या पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे धर्माबाद तालुक्यातील शेतकरी अधिकच चिंताग्रस्त झाले आहेत.
खरीप हंगामात पाऊस कमी झाल्याने कापूस या पिकाच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे. त्याच सोबत शहर व परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तुरीला शेंगा, फुलांची लागवड झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ढगाळ वातावरणामुळे फुलगळ व शेंगा पोखरणाºया अळीच्या प्रादुभार्वामुळे शेतकºयांना पुन्हा नुकसानीचा सामना करावा लागत आहे. तूर पिकांची फुले गळणे सुरू झाले असून, पाने खाणारी अळी, शेंगा पोखरणाºया अळीचा प्रादुर्भाव पिकावर झाला आहे. यामुळे पीक उत्पादनात मोठी घट होण्याची भीती असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
या शेंगा पोखरणाºया आळीवर नियंत्रणासाठी कीटकनाशक फवारणीचा पर्याय असला तरी, ढगाळ वातावरणामुळे गळणारी फुले थांबविण्यासाठी कोणताच पर्याय नाही. त्यामुळे पीक उत्पादनात मोठ्या प्रमाणात गट होण्याची भीती आहे. आता ढगाळ वातावरणा बरोबरच धूके पडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे या पिकावरील संकट अधिकच वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
याबाबत धर्माबादचे तालुका कृषी अधिकारी अरविंद जाधव यांना विचारले असता ते म्हणाले, तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे तुरीवर शेंगा पोखरणाºया अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यासाठी शेतकºयांनी त्वरित किटकनाशकांची फवारणी करून घ्यावी. शेतकºयांना याबद्दल मार्गदर्शन तालुका कृषी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे अशी माहिती तालुका कृषी अधिकारी अरविंद जाधव यांनी दिली आहे.
तीन मंडळातंर्गत २ हजार ४२ हेक्टर तुरीची लागवड
धर्माबाद तालुका कृषी कार्यालयातंर्गत तीन मंडळ असून धर्माबाद मंडळामध्ये ५३४ हेक्टर तुरीची लागवड करण्यात अली आहे. याबरोबर जारीकोट मंडळामध्ये ७५४ हेक्टर आणि करखेली मंडळातंर्गत ७५४ हेक्टरमध्ये तुरीची लागवड करण्यात आली आहे. धर्माबाद तालुक्यात एकूण २ हजार ४२ हेक्टरमध्ये तुरीची लागवड करण्यात आली असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.
उत्पादनात घट होणार
तूर पिकांची फुले गळणे सुरू झाले असून पाने खाणारी अळी, शेंगा पोखरणाºया अळीचा प्रादुभार्व पिकावर झाला आहे़ यामुळे पीक उत्पादनात मोठी घट होण्याची भिती शेतकºयांना व्यक्त केली़