नमनालाच ऑफलाईनचा खोडा

By admin | Published: December 5, 2014 03:12 PM2014-12-05T15:12:18+5:302014-12-05T15:12:18+5:30

जिल्ह्यातील ८३ ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेला गुरूवारपासून प्रारंभ झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे.

Dig the offline offline | नमनालाच ऑफलाईनचा खोडा

नमनालाच ऑफलाईनचा खोडा

Next

 

 
अनुराग पोवळे /नांदेड
जिल्ह्यातील ८३ ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेला गुरूवारपासून प्रारंभ झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरावा लागणार असून पहिल्यांदाच राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाला पहिल्याच दिवशी ऑफलाईनाचा खोडा बसला आहे.
जानेवारी ते एप्रिल २0१५ मध्ये मुदत संपणार्‍या तसेच विभागजनामुळे व नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व रिक्त पदांसाठी पाटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यात नांदेड जिल्ह्यातील ८३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व २२ ग्रामपंचायतीतील ३३ जागांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषीत करण्यात आला आहे. या निवडणुकीत इच्छूक उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे दाखल करताना ती ऑनलाईन पद्धतीने भरणे अनिवार्य करण्यात आले होते. उमेदवारी दाखल करण्याचा पहिला दिवस ४ डिसेंबर हा होता. ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी सज्ज असलेल्या अनेक उमेदवारांनी सकाळीच आपली उमेदवारी दाखल करण्यासाठी संगणक केंद्रांकडे धाव घेतली. मात्र या इच्छुकांना दिवसभरात आपली उमेदवारी दाखल करता आली नाही. 
जिल्ह्यात माहूर तालुक्यात सिंदखेड ग्रामपंचायत, नांदेड तालुक्यातील ब्राह्मणवाडा, आलेगाव, कोटतीर्थ, वाडी पुयड, वडगाव, धनगरवाडी, खुपसरवाडी, नांदुसा/भालकी, वडवणा/खडकी, मुखेड तालुक्यातील डोरनाळी, चिवळी, सांगवी बेनक, अडलूर/नंदगाव, मंडलापूर, मारजवाडी, कोटग्याळ/वसंतनगर, शिरूर द., राजुरा बु., हिप्परगा दे., वर्ताळा/शेळकेवाडी, राजुरा बु. तांडा, तग्याळ, गोणेगाव, बेरळी बु., बेरळी खु., सांगवी भादेव, उंद्री
प.दे., मेथी/खपराळा, येवती, चव्हाणवाडी, आखरगा, धनज/जामखेड, हिमायतनगर तालुक्यातील महादापूर, सवना ज., वाघी एकघरी/रमणवाडी, चिंचोर्डी, बिलोली तालुक्यातील तोरणा, किनाळा, केसराळी, पोखर्णी, चिंचाळा, हिप्परगामाळ, खतगाव, रामतीर्थ, हुनगुंदा, रामपूरथडी, नायगाव तालुक्यातील होटाळा, टाकळी त.ब., मांडणी, शेळगाव छत्री, नावंदी, रातोळी, किनवट तालुक्यातील दहेगाव चि., कुपटी बु., आंदबोरी ई., गोंडेमहागाव, बोधडी खु., लिंगी, मलकापूर, मलकवाडी, रामपूर/भामपूर, करंजी हुडी, मुदखेड तालुक्यातील पांढरवाडी, पिंपळकौठा, अर्धापूर तालुक्यातील गणपूर, सांगवी खु., खडकी, देगलूर तालुक्यातील तुपशेळगाव, कंधार तालुक्यातील बोरी खु., मरशिवणी, बाचोटी, संगुचीवाडी, लोहा तालुक्यातील कामळज, हळदव, चितळी, धानोरा मक्ता, जोशीसांगवी, जोमेगाव, मुरंबी, कलंबर खु., बोरगाव आ. आणि गौंडगाव या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. त्यासह किनवट तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीमध्ये तर उमरी तालुक्यात १२ ग्रामपंचायतीमध्ये काही जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी तालुकास्तरावर निवडणूक कक्ष स्थापन केला आहे. ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर संबंधित कागदपत्रे ही निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना द्यावी लागणार आहेत. त्यानंतर या कागदपत्रांची खात्री केल्यानंतरच उमेदवारांना अर्ज भरल्याची पावती दिली जाणार आहे.  
■ राज्यातील अनेक जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. गुरूवारी सर्वत्रच ऑफलाईनची तांत्रिक अडचण आली. दुपारपर्यंत काही जिल्ह्यात ऑनलाईन लिंक सुरू झाली होती. मात्र नांदेड आणि रायगड मात्र सायंकाळी ६ पर्यंत ही अडचण कायम होती. ती दूर झाली असून उमेदवारांना अर्ज भरता येणार आहेत. - प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी.
 
इच्छुकांची तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयात विचारणा
ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्यासाठी दिलेली ऑनलाईन लिंक गुरूवारी दिवसभर कार्यान्वितच झाली नाही. त्यामुळे अनेकांनी तहसील कार्यालयात विचारणा केली. अनेकांनी तहसीलदारांना विचारणा केली तर काही इच्छूकांनी जिल्हाधिकार्‍यांकडेही धाव घेतली. यावेळी तांत्रिक अडचण आली असल्याचे त्यांना सांगण्यात आले. 
 
अखेर सायंकाळी सुरु झाली डाटा फिडींग
या अडचणीबाबत जिल्हा निवडणूक विभागाने राज्य निवडणूक आयोगाशी संपर्क साधून लिंक सुरू करण्यासाठी दिवसभर प्रयत्न केले होते. अखेरीस संध्याकाळी सहाच्या सुमारास ही लिंक सुरू झाल्याची बाब निवडणूक विभागाने स्पष्ट केले. या लिंकवर बेसिक डेटा फिडिंग करण्याचे काम जिल्हा निवडणूक विभागाने सुरू केले होते. 
 
८ डिसेंबरपर्यंत भरता येणार आहेत उमेदवारी अर्ज 
उद्या शुक्रवारी मात्र ग्रामपंचायत उमेदवारांना उमेदवारी दाखल करता येईल असे सांगण्यात आले. ग्रामपंचायत निवडणुकीत ८ डिसेंबर पर्यंत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार आहे. ९ डिसेंबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. ११ डिसेंबर हा नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा शेवटचा दिनांक असून २३ डिसेंबर रोजी मतदान तर २४ डिसेंबर रोजी निकाल जाहीर केले जाणार आहेत. 

Web Title: Dig the offline offline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.